डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांना ऑनलाईन श्रद्धांजली सभेने श्रद्धांजली अर्पण..श्रुती संगीत निकेतन चा पुढाकार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांना ऑनलाईन श्रद्धांजली सभेने श्रद्धांजली अर्पण..श्रुती संगीत निकेतन चा पुढाकार..

डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांना ऑनलाईन श्रद्धांजली सभेने श्रद्धांजली अर्पण..श्रुती संगीत निकेतन चा पुढाकार.. 

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर येथील सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ. मधुसूदन नागेश बोपर्डीकर यांचे दि. 16 मे 2021 रोजीअल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे वाई जि. सातारा येथील होते व नोकरीच्या निमित्ताने नगर येथे स्थायिक झाले. अहमदनगर महाविद्यालयात काही वर्षे संस्कृत विषयाचे अध्यापन केले व त्या नंतर काही वर्षे सारडा महाविद्यालयात संस्कृत अध्यापक व माजी प्राचार्य म्हणून काम पाहिले. सरांचा संगीताचा व्यासंग खूप मोठा होता त्यांनी संगीतातही अनेक विद्यार्थी घडवले व अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे मार्गदर्शन केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, विद्यावाचस्पती असे अनेक सांगता येतील. तसेच संस्कृत मध्ये ते पी. एच. डी होते ,अर्ध मागधी मध्ये ही त्यांचा गाढा अभ्यास होता .संगीतात ते अलंकार परीक्षा उत्तीर्ण होते. ते उत्कृष्ट ऑर्गन वादक होते त्यांना नाट्य संगीत विशेष आवडत असे. बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान व रियाज कला मंच या माध्यमातून अनेक विद्यार्थी व कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. किती ही लहान कलाकार असो ,विद्यार्थी असो ,मोठा असो ते भरभरून कौतुक करायचे. नुकतीच त्यांना श्रद्धांजली म्हणून ऑनलाईन श्रद्धांजली सभा श्रुती संगीत निकेतन च्या पुढाकारातून घेण्यात आली. संस्थेचे सचिव श्री. मकरंद खरवंडीकर व सहसचिव श्री. प्रसाद सुवर्णपाठकी यांनी सभेचे आयोजन केले.या सभेस नगरमधील संगीत क्षेत्रातील सर्व मान्यवर, गुरू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment