नगर कॉलेजमध्ये कोरोना जनजागृती अभियान स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम गुगल मिट द्वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

नगर कॉलेजमध्ये कोरोना जनजागृती अभियान स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम गुगल मिट द्वारे

 नगर कॉलेजमध्ये कोरोना जनजागृती अभियान स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम गुगल मिट द्वारे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर कॉलेजमध्ये कोरोना जनजागृती अभियान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्या स्पर्धेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे  समन्वयक, डॉ. संतोष परचुरे म्हणाले कि कोरोनाला हरवण्यासाठी आपणास लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी लागेल. या अभियानात तरुणांची भूमिका महत्वाची, आहे तरुणांनी ठरवल्यास काही आवघड नाही कारण तरुण हे देशाचे आधार स्तंभ आहेत. तर अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य डॉ रजनीश बार्नबस म्हणाले कि, कोरोनामहामारीच्या काळात ऑनलाइन कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. कारण या प्रणाली द्वारे आपणास सहज कार्यक्रमाची आखणी करून, त्याची योग्य अंमलबजावणी करता येते. मुलांनी आशा कार्यक्रमात नेहमी सहभाग नोंदवला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. हि स्पर्धा ऑनलाईन  माध्यमातून घेण्यात आली. या स्पर्धेत चार विद्यापीठातील (मुंबई विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर) सतरा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला, तर  117 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या नंतर पारितोषिक विजेत्यांची घोषणा झाली यात प्रथम क्रमांक समान मार्क पडल्यामुळे विभागगुण देण्यात आला. दिशा ठाणगे ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर, काळे कल्पना काशिनाथ, दिलीप जाधव (कला, वाणिज्य आणि विज्ञान कोलेज सोनई), अदिती आप्पासो कणसे यशवंत चव्हाण सायन्स संस्था सातारा, काळे श्रीकांत, प्रतीक्षा मराठे ,मासिरा शेख , मुस्कान कुमारी, सय्यद फिरदोस हासन (अहमदनगर कॉलेज अहमदनगर). तर दिवीतीय क्रमांक वणवे अमोल शिवाजी कला ,वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज सोनई. आणि तृतीय क्रमांक शेख मासिरा अल्ताफ (अहमदनगर कॉलेज अहमदनगर), अजित राजकुमार कांबळे (मराठवाडा  मित्र मंडळ कॉलेज इजिनीअरीग कर्वेनगर पुणे) यांनी प्राप्त केले.

No comments:

Post a Comment