राळेगन-तांदळी येथे लसीकरण मोहीम यशस्वी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

राळेगन-तांदळी येथे लसीकरण मोहीम यशस्वी

 राळेगन-तांदळी येथे लसीकरण मोहीम यशस्वी 



नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर - नगर तालुक्यातील राळेगन व तांदळी येथे 'गाव तेथे लसीकरण' मोहीम गुरुवारी (दि.6) यशस्वीरित्या पार पडली. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, मा. उपसभापती रवींद्र भापकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, सरपंच रमेश बापू ठोंबरे, राळेगन चे सरपंच सुधीर भापकर, संतोष हराळ, ग्रामसेवक जगदाळे आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी कोव्हीड 19 च्या नियमांचे पालन करून लसीकरण करून घेतले. मा. जि. प. सदस्य हराळ व मा. उपसभापती भापकर यांच्या सुयोग्य नियोजनातून रुईछत्तीसी गुंडेगाव परिसरातील लसीकरण यशस्वीरित्या पार पडत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. लसीकरण यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे, डॉ. एस. एन. ससाणे, डॉ. सूर्यकांत यादव, डॉ. मनीष हिवाळे, एल. ई. कार्ले, एन. जी. तांबोळी, विजया लंके, अशा से. आंधळे आदींनी परिश्रम घेतले.

'नागरिकांनी संयम पाळावा' - 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागल्याने सध्या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. रुई छत्तीसी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील गावपुढाऱ्यांकडून लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. तर दुसरीकडे लसिंचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने लसी मिळण्यास अडचणी येत आहेत. रोटेशन पद्धतीने सर्व गावांना लस मिळणार असून परिसरातील गाव पुढाऱ्यांनी तसेच नागरिकांनी संयम पाळून सहकार्य असे आवाहन मा. उपसभापती रवींद्र भापकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment