"मॉडेल व्हिलेज गोरेगाव कोविड सेंटर" सौ.सुमन बाबासाहेब तांबे या महिला सरपंचाचा पथदर्शी उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

"मॉडेल व्हिलेज गोरेगाव कोविड सेंटर" सौ.सुमन बाबासाहेब तांबे या महिला सरपंचाचा पथदर्शी उपक्रम

 "मॉडेल व्हिलेज गोरेगाव कोविड सेंटर" सौ.सुमन बाबासाहेब तांबे या महिला सरपंचाचा पथदर्शी उपक्रमनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

मॉडेल व्हिलेज गोरेगावतील कोविड सेंटर मधील रुग्णांची आरोग्य विभाग तसेच खाजगी डॉक्टर तपासणी करतात.सर्व रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल ९६+ आहे त्यांना येथे ठेवले जाते.ज्यांना किरकोळ त्रास असेल त्यांना औषधे पुरवण्यात येतात.त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते.

बाबासाहेब तांबे मित्र मंडळाच्या वतीने दोन वेळ ब्लॅक टी (काढा),दोन वेळ सकस आहार, गोळ्या औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र जेवणाचे पॅकेट पोहोच केले जात आहे.वैद्यकीय तपासणी वगळता इतर नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते यांना कक्षात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.यामुळे रुग्णांचा कोणाशीही प्रत्यक्ष येत नाही.जास्तीत जास्त टेस्टिंग करून संसर्गित नागरिक शोधून काढणे,त्यांना तात्काळ कोरोना कक्ष,विलगिकरण कक्षात दाखल करून घेणे गरजेचे आहे.

काल  मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे कोरोना चाचणी घेण्यात आल्या.खाजगी डॉक्टरां मार्फत  ५० रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या त्यात १२  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.त्यातील ७ लोकांना शाळेत तसेच ५ लोकांना इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.संशयित लोकांपैकी १५ लोकांच्या RTPCR टेस्ट करण्यात आल्या.त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.आम्ही गावात खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून टेस्टिंग कॅम्प आयोजित केला आहे.जास्तीत जास्त लोकांचे ट्रेसिंग करणे गरजेचे आहे त्याने संसर्ग रोखून आम्ही लवकरच गोरेगाव कोरोना मुक्त करणार आहोत.तसेच भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मानूरकर मॅडम यांनी काल गोरेगाव कोविड केअर सेंटर ला भेट दिली.रुग्णांची माहिती घेतली. तसेच खाजगी डॉक्टरांशी रुग्णांच्या आरोग्याबाबत चर्चा केली.सरपंच आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी सर्व टीमचे त्यांनी कौतूक केले.तालुक्याच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे मॅडम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लाळगे सर,वैद्यकीय अधिकारी डॉ.मानूरकर मॅडम,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.भाग्यश्री उबाळे मॅडम,वडेपल्ली सिस्टर,सर्वांचे नेहमी सहकार्य लाभते.या सर्वांची टेस्टिंग किट,लसीकरण इतर बाबतीतही तात्काळ मदत मिळत असल्याचे सौ.तांबे यांनी सांगितले.

गेली वर्षभर आम्ही सातत्याने गावात जनजागृती करतोय,अनेक पथदर्शी उपक्रम कोरोना काळात राबवले.आमची रुग्ण संख्या जास्त दिसत होती कारण आम्ही जास्त टेस्टिंग करत होतो.संसर्गित लोकांना शोधणे त्यांचे विलगिक रण तसेच उपचार करणे,यावर भट दिला.यामुळे निश्चितच गोरेगाव मध्ये भविष्यात रुग्ण संख्या घटलेली दिसेल.जास्तीच्या टेस्टिंग केल्या नसत्या तर रुग्ण संख्याही दिसली नसती,पण लोकांच्या आरोग्याचा आम्ही विचार केला.घरोघर जाऊन आमच्या टीमने काम केले,माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियान यशस्वीपणे पार पाडले,आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधोकारी डॉ.भाग्यश्री उबाळे,आरोग्य सेवक श्री.कोल्हे,वडेपल्ली सिस्टर,आशा सेविका,आंगणवाडी सेविका,ग्रामसेवक श्री.जाधव ,तलाठी श्री.येवले सर्व ग्रामपंचायत तसेच महसूल कर्मचारी यांनी स्वतः जीव धोक्यात घालून गोरेगावच्या लोकांना सेवा दिली आहे.परिसरात सर्वात जास्त टेस्टिंग कॅम्प गोरेगाव येथे आरोग्य उपकेंद्रात आयोजित केले गेले.श्री.बाबासाहेब तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अगदी सूक्ष्म नियोजन करून उत्तम व्यवस्थापण ठेवून कोरोना काळात काम करत आहोत.गे टीम वर्क आहे,सर्व कार्यकर्ते यासाठी आपलं मोलाचं योगदान देत आहेत.सर्व रुग्णांना औषधोपचार,तसेच सकस आहार त्याबरोबरच भावनिक आधार  साहेब आणि आम्ही देत आहोत.या संकट काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत.संपूर्ण गावाची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे.आमचं काम तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात आदर्शवत राहील याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. असा ठाम विश्वास सरपंच सौ.सुमन तांबे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here