योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांकडून दहा पटीने दंड वसुली करा ः डॉ. अशरफी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांकडून दहा पटीने दंड वसुली करा ः डॉ. अशरफी

 योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांकडून दहा पटीने दंड वसुली करा ः डॉ. अशरफी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मार्च 2020 पासून भारताची विशेषता महाराष्ट्राची कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सरकारी रुणालय सोबत खासगी रुग्णालयात कोविड चे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सरकार ने राज्यात काही रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत आरोग्य योजने अंतर्गत उपचार कण्याची परवानगी दिली असल्याने कोरोना आजारही या योजने अंतर्गत उपचार करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्यात फक्त 5 हजार रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला. याचाच अर्थ की ज्या रुग्णालयात योजना आहे त्यांनी लाभार्थी ला लाभ दिला नाही व त्यांची दिशाभूल करून अवाजवी रक्कम उकळली. सदर प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी मा .मुख्य मंत्री साहेब व अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना पाठवले आहे.
निवेदनात पुढे लिहिले आहे की अहमदनगर जिल्ह्यातही अशे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर येथील काही रुगणालयात तर योजनेचे कार्यालय बंद असून काही ठिकाणी डॉक्टरने सांगितले तरच योजनेचा लाभ दिला जातो, काही ठिकाणी वरीष्ट अधिकार्‍यांचे फोन आल्यानंतर योजनेचे लाभ मिळतात, तर काही ठिकाणी आजार योजनेत असतांना रुग्णाच्या नातेवाईकाला आजार बसत नाही पूर्ण पैसे भरावे लागेल असे उत्तर देण्यात येतात, या सर्व पाहता संबंधित रुग्णालय योजनेचा लाभ न देता जास्त पैसे रुग्णां कडून वसूल करीत असावे. सरकारने कोरोना रुग्नांचे किती दर अकरावे हे ठरून दिले असता, खासगी रुग्णालय मनाला वाटेल ते दर लाऊन पैसे उकळत असल्याचे दिसते, विचारणा केली असता तुम्हाला बेड दिले हे महत्वाचे, बिल आहे ते भरून आपले रुग्ण घेऊन जावे. भरारी पथकाला संपर्क करून सांगितले तर त्यांच्या कडून असे उत्तर येते कि तुम्ही आहे ती रक्कम भरून आमच्या कडे तक्रार करा आम्ही त्याची चौकशी करून कार्यवाही करू अशे गंभीर आरोप एम आय एम तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशात नागरिकांना मा.जिल्हा अधिकारी साहेबांना रीतसर तक्रार करण्याचे सांगितले आहे. परंतु त्याच बरोबर ज्या रुग्णालयात महात्मा फुले आणी आयुष्मान भारत योजना आहे त्यांनी अत्ता पर्यंत किती रुग्णांना लाभ दिला याची उलट तपासणी करणे गरजेचे आहे. कारण जर रुग्णालयाने योजनेत बसणार्‍या रुग्णांना योजनेचा लाभ न देता त्यांची दिशाभुल करून पैसे उकळत असेल तर त्या रुग्णालय कडून 10 पटीने रक्कम वसूल करण्याचे आदेश सरकारने द्यावे. जेणे करून भविष्यात अशे कृत्य होणार नाही. आणी जो अधिकारी किंवा कर्मचारी या प्रकरणाला पाठीशी घालत असेल त्यांच्यावरही योग्य निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, अशे निवेदनात लिहिले आहे.
निवेदनात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जिल्हा महासचीव जावेद शेख,मास चे जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक असिफ सुलतान, विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख,शहेबाज शेख,सलमान खान,आरिफ सय्यद आदिंचे सह्या आहेत.

No comments:

Post a Comment