सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 6, 2021

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी

 सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफीनगरी दवंडी

नगर - भारताची, विशेषता महाराष्ट्राची परीस्तीती खूप गंभीर होत चालली असून कोरोना ने आपल्या राज्यात इतका थैमान घातले आहे की जवळ जवळ प्रत्यक कुटुंबातील कोणी ना कोणी कोरोनाच्या संसर्गाने आजारी तरी आहे. काहींना आपल्या जिवलग व्यक्ती सोडून गेलेत. आपल्या राज्यत असे कोणी नसेल ज्याचे नातेवाईक पैकी कोणी कोरोना ने आजारी नाहीत. मागील वर्षीचा कोरोना विषाणू आणी आजचा कोरोना विशानुत खूप फरक आहे. सध्याचा विषाणू हा खूपच भयंकर आहे. रुग्णाला अचानक श्वास घेण्याचे त्रास होऊन आजार वाढत आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवणे व लवकरात लवकर उपचार करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. पूर्ण जगासह भारताने मागील वर्षी लॉकडाऊनची घोषणा करून सामान्य जनतेला घरी राहण्याचे आव्हान केले. तेव्हा पासून सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीती खूप बिकट आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने पूर्ण महाराष्ट्रत परत लॉकडाऊन करण्यात आले. सध्या सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीत खूप खालावली आहे. त्यात कोरोनाने आजारी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्या अगोदर पैसे भरण्यास भाग पाढले जात आहे . खासगी रुग्णालय शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क आकारत नाही. विचारणा केली असता तुम्हाला बेड व सर्व सुविधा दिली हेच तुमच्या साठी खूप आहे, बिल दिले ते भरून जावे.

लॉकडाऊन मुळे सामान्य जनता आर्थिक खूप मागासली असून त्यांचे उपचार होणे खूप गरजेचे आहे. ज्यांचे कडे लाखो रुपये भरण्यास नाही ते घराबाहेर पढण्यास तयार नाही, कारण पैसे आणणार कुठून. आपल्या कडे आहे ती पुंजी लॉकडाऊन मध्ये संपली आहे किंवा संपायला आली. त्यात रुनालायाचे खर्च कसे झेपणार. या सर्व बाबींचा एकच अर्थ निघतो की सामान्य जनतेकडे सध्या स्वताच्या उपचारासाठी पैसे नाहीत. जे उपचार करीत असतील एक तर आपले सर्व काही विकून किंवा कर्ज घेऊन करीत असतील असे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


निवेदनात पुढे विनंती केली आहे की जर महाराष्ट्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयाला महात्मा जोतीबा फुले योजनेत तातडीने समाविष्ट करून त्यांना प्रत्यक रुग्णाला योजने अंतर्गत उपचार करण्याचे आदेश दिलेतर महाराष्ट्रातील सर्व जनतेला योग्य आणी मोफत उपचार मिळेल.जी जनता पैसे नसल्याने घरात बसून आहे त्यांना पण उपचार घेण्याची संधी मिळेल. आणी सर्वात मोठी गोष्ट की रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नागरिक हा विचार करणार नाही की त्याच्याकडे पैसे आहे कि नाही तो फक्त महाराष्ट्र सरकारचा जय जय कार करीत रुग्नालयात दाखल होऊन उपचार घेऊन घरी येईल.खासगी रुग्णालय ही सरकार कडून पैसे येत असल्याने समाधानी होऊन रुग्णाचे उपचार करतील.असे निवेदणाचे पत्र एम आय एम तर्फे मुख्य मंत्री यांना देण्यात आले आहे. त्यात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जिल्हा महासचीव जावेद शेख,मुफ्ती अल्ताफ,असिफ सुलतान,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी,युवा शहर अध्यक्ष अमीर खान,ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख,शहेबाज शेख,सलमान खान,आरिफ सय्यद आदी. सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here