टंचाईग्रस्त गुंडेगाव वनविभागामुळे होणार पाणीदार..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

टंचाईग्रस्त गुंडेगाव वनविभागामुळे होणार पाणीदार.....

 टंचाईग्रस्त गुंडेगाव वनविभागामुळे होणार पाणीदार.....



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी:- नगर  तालुक्यातील गुंडेगाव नेहमीच  तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव . या गावात  अनेक कामे जलसंधारणाच्या कामांतून हाती घेतले आसून गाव लवकरच  पाणीदार होणार  आहे.या गावाला    गतिमान पाणलोट अभियान  बरोबर वन श्रेत्रातील माती बंधारे वरदान ठरणार आहेत. बघता बघता गाव लवकरच  पाणीदार होणार आसून  पीकपद्धतीला, खरीप, रब्बी हंगामाला बळकटी मिळणार आसून गावातील  शेतकऱ्यांचे जीवनमानही त्यातून उंचावण्यास मदत होणार आहे. 

नगर तालुक्यातील गुंडेगाव  हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा. शेतकरी कायम अडचणीत असायचा. यावर उपाय शोधून वन विभागाच्या माध्यमातून ८१६ हेक्टर वनक्षेत्रात  पाणी व्यवस्थापनातूनच कायापालट  मिळणार आहे . पडणारे पाणी जमिनीत मुरविणे, हा त्यातील मुख्य पर्याय आसून  गावाच्या वनक्षेत्रात जलसंधारणाची कामे हाती घेतली आसून  संपूर्ण गावाचा शाश्वत विकास होणार आहे . विद्यमान  उपसंरपच संतोष भापकर  यांनी ग्रामस्थांना याबाबतचे महत्त्व पटवून दिले आहे  . 

   येत्या पावसाळ्यात वन विभागाच्या माध्यमातून ३५ लक्ष रुपये किंमतीचे  बंधारे व डीप सीसीटी चे कामे  गावाला पाणीदार बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आसून. गावास पंचटेकडी  व चौरा डोंगर  तसेच मध्यम उंचीचे  डोंगरांची देणगी आसून  याच डोंगराच्या कुशीतुन शुढ्ळेश्वर नदी चे पाणी अडविण्याची साधने नसल्यामुळे पाणी वाहून जात होते. सन २०१५ मध्ये  वनराई बंधारे उभारणी करण्याचे काम हाती घेतले. हाच निर्णय गाव पाणीदार होण्यास ‘टर्निंग पॅाइंट’ ठरले आसून पुढील काळात गुंडेगाव वनहद्दीमध्ये जलसंधारणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल आसे जिल्हा वनसंरक्षक सुनील पाटील यांनी सांगितले आसून पुढील काळात गुणवत्तामक कामे केली जातील आसे मत नगर तालुका वनसंरक्षक अधिकारी सुनील थिटे यांनी सांगितले.

      नुकतेच वन विभागातील कामांची पाहणी करण्यात आली आसून विद्यमान  उपसंरपच संतोष भापकर, सतिश चौधरी यांच्या उपस्थितीत  वनक्षेत्रात  वाघदरा भागातील वनक्षेत्रात माती  बंधार्याचा नारळ फोडून   शुभारंभ करण्यात आला आसून यावेळी उद्योगजक शंभर भापकर, कोडिंबा भिसे, विशाल पिंपरकर, खंडू भिसे, राजेंद्र पिंपरकर, मंकरद भिसे, वन कर्मचारी कचरू भापकर,ठेकेदार गुंड साहेब व बापू बेरड उपस्थिती त होते यावेळी निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळीचे प्रसिद्धी प्रमुख यांनी वन विभागातील सध्या चालू झालेले कामे गुणवत्तामक आसून पुढील काळात गुंडेगाव पाणीदार होणार आसून यामध्ये वन विभागाचा मोठा वाटा आसेल आसे मत व्यक्त केले आहे......

No comments:

Post a Comment