प्रत्येक नागरिकाची मोफत कोरोना चाचणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

प्रत्येक नागरिकाची मोफत कोरोना चाचणी

 प्रत्येक नागरिकाची मोफत कोरोना चाचणी

मुकिंदपूरचे सरपंच दादा निपुंगे व नेवाशाचे नगरसेवक सचिन नागपुरे त्यांचा अभिनव उपक्रमनगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा नगरपंचायत तसेच मुकिंदपूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोणा रुग्णांची संख्या बघता नेवासा नगरपंचायत व मुकिंदपूर ग्रामपंचायतने  लॉक डाऊन करून कडक निर्बंध जारी केले. त्यामुळे नागरिक आता  घरीच असल्याने शहरांमधील प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक गटनेते सचिन नागपूरे आणि सरपंच दादा निपुंगे यांनी कर्मचारी व आरोग्य सेवक यांना घेऊन आपापल्या प्रभागांमधील प्रत्येक घरात जाऊन टेस्ट करायचे ठरवले.त्याप्रमाणे काल दिनांक 17 मे रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळेत न थांबता आरोग्य कर्मचार्‍यांना घेऊन प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन कोरोना टेस्ट सुरू केले. पहिल्या दिवशी नागरिकांनी टेस्ट करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिल्याने नगरपंचायत वॉर्ड क्रमांक 5 मध्ये तीन वाजेपर्यंत 78 कोरोणा टेस्ट करण्यात आल्या.तर मुकिंदपूर ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक दोन शिवाजीनगर येथे 49 टेस्ट करण्यात आल्या.  किट संपल्यामुळे नगरसेवक सचिन नागपुरे यांनी नगरपालिकेचे अधिकारी नवले साहेब यांच्याकडे आणखी शंभर-दोनशे किट ची मागणी केली.यापुढेही सर्व नागरिकांच्या अशाच कोरोना टेस्ट यापुढे चालू राहतील, असे या वेळी मुकिंदपूर चे सरपंच दादा निपुंगे आणि नगर पंचायत नगरसेवक सचिन नागपुरे यांनी सांगितले.या वेळी त्यांच्या या अभिनव उपक्रमाला रितेश कराळे,गणेश माटे,संजय लिपाणे,मक्तापूर शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे,विवेक ननवरे,भास्कर गाडेकर,भाऊसाहेब आंबाडे,तसेच ग्रामपंचायत, नगरपंचायत कर्मचारीआणि आरोग्यसेवेतील परिचारिका यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here