प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मेहकरी कोविड सेंटला दिला मदतीचा हात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मेहकरी कोविड सेंटला दिला मदतीचा हात

 प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मेहकरी कोविड  सेंटला दिला मदतीचा हात

संकट काळात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे-अभिलाष घिगे



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- प्राथमिक शिक्षकांनी कोरोना संकट काळामध्ये आपापल्या कामाची जबाबदारी संभाळून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. नगर तालुक्यातील शिक्षकांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना आरोग्यदायी साहित्याचे वाटप केले. सामाजिक कामात प्रत्येकाला समाधान मिळते,कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल शिक्षकांनी नेहमीच संकटकाळात मोलाचे योगदान देण्याचे काम केले आहे.असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले.

         मा.खा.कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये जिल्हा परिषद मेहकरी केंद्रातील शिक्षकांच्या वतीने ११० पिण्याच्या पाण्याचे बॉक्स भेट देण्यात आले.यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष मस्के,संचालक बाबासाहेब खर्से,संचालक दिलीप भालसिंग,रेवन चोभे,सरपंच संतोष पालवे,सुधीर पोटे,दीपक लांडगे,गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत सोनार, केंद्रप्रमुख सुर्यभान काळे,मधुकर मैड, महेश भनभणे, शरद साठे, बाळासाहेब चाबुकस्वार, संतोष गव्हाणे,सुधीर पोटे आदी उपस्थित होते.

      गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत सोनार म्हणाले की,बाजार समितीने या परिसरात सुरू केलेल्या कोविड सेंटर मुळे या परिसरातील कोरोना रुग्णांनावर यशस्वीरित्या उपचार झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यास मदत झाली कोरोना रुग्णांना एक दिलासा देण्याचे कामकोविड सेंटर मुळे झाले, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक दृष्टिकोनातून आज हा उपक्रम राबवला असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

     यावेळी बोलताना बाबासाहेब खर्से म्हणालेकी,मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकारी येथे बाजार समितीच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम सुरू केले.या परिसरातील कोरोना रुग्णांना लक्षणे जाणवल्यास कोविड सेंटर मध्ये भरती केले त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास मदत झाली,कोविड सेंटरच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांन मध्ये जनजागृती करण्यात आली, बाजार समितीच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये मोफत सुविधा दिल्या. अनेक रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले असे म्हणाले.

No comments:

Post a Comment