श्रीगोंद्याचे सुपुत्र प्रेमकुमार दांडेकरची नक्षलवादी खात्मा मोहीमेत धडाकेबाज कामगिरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

श्रीगोंद्याचे सुपुत्र प्रेमकुमार दांडेकरची नक्षलवादी खात्मा मोहीमेत धडाकेबाज कामगिरी

 श्रीगोंद्याचे सुपुत्र प्रेमकुमार दांडेकरची नक्षलवादी खात्मा मोहीमेत धडाकेबाज कामगिरी नगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी: 

गडचिरोली जिल्ह्यातील पैंडी जंगलात नक्षलवाद्यांनी विशेष पोलिस पथकावर सशस्त्र हल्ला केला त्यावर महाराष्ट्र पोलिस जवानांनी 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान केले . या थरारक मोहीमेत श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांनी काही नक्षलवाद्यांचा खात्मा करुन नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे . प्रेमकुमार दांडेकर यांनी बुध्दी कौशल्याने केलेल्या कामगिरीवर गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी प्रेमकुमार दांडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे .


दि . 21 मेच्या पहाटे पैंडीच्या जंगलात सुमारे 40 सशस्त्र नक्षलवादी व पोलिस जवान आमने सामने आले फायरिंग सुरु झाली विशेष पोलिस पथकाच्या पहिल्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला . त्यावर दुसरी तुकडी पहिल्या तुकड्याच्या मदतीला धावली दोन तुकड्यांमधील जवानांचा आक्रमक पणा पाहुन नक्षलवादी पळू लागले . त्यावर तिसऱ्या तुकडीने नक्षलवाद्यांना समोरून घेरले आणि 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान केले यामध्ये श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर लहू दांडेकर यांनी आपल्या एके 56 रायफल मधून काही नक्षलवाद्यांचा आस्मान दाखविले आपल्या सहकारी बांधवांचे प्राण वाचविले . प्रेमकुमार दांडेकर यांनी या मोहीमेत उत्कृष्ट कामगिरी केली यांची दखल विशेष पोलिस पथकाचे प्रमुख मनिष कलवानिया व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दखल घेत प्रेम कुमार व्हेरीगुड वर्क म्हणून कौतुकाची थाप मारली महाराष्ट्र शासनाने या मोहीमेसाठी 60 लाखाचे बक्षिस ठेवले होते . प्रेमकुमार दांडेकर हा सन 2017 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here