सर्वांनी घरीच राहून प्रशासनासं सहकार्य करावे:संभाजी लोंढे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

सर्वांनी घरीच राहून प्रशासनासं सहकार्य करावे:संभाजी लोंढे.

 सर्वांनी घरीच राहून प्रशासनासं सहकार्य करावे:संभाजी लोंढे.


नगरी दवंडी

माका प्रतिनिधी_कोरोना साथीबाबत सुरुवातीला शहरी भागात तसेच आत्ता अलीकडे ग्रामीण भागातील कहराने ठिकठिकाणी उच्चांक केला असुन,याबाबत तर संपूर्ण जगावरती संकट कोसळले असल्याने,ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.या वाढत्या रुग्ण संख्येस पायबंद घालण्यासाठी स्थानिक उपकेंद्रावरती ठिक ठिकाणी लसीकरण सुरू करावे.ग्रामीण भागातील जनतेने सर्वांनी घरीच थांबुन कोरोना बाबतीत नियम व सूचनांचे पालन करुन संबधित प्रशासनास सहकार्य करावे.असे मत अहमदनगर जिल्ह्यातील रासपचे शिर्डी लोकसभाअध्यक्ष संभाजी लोंढें यांनी व्यक्त केले आहे.            याबाबत असे की,आजरोजी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागात कोरोना बाबतीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.याबाबतीत सगळीच जबाबदारी शासकीय अधिका री वर्गावरती न टाकता,आपण स्वतः प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.सध्यातरी सर्व धर्मीय बांधव   यांनी सणसुद थोड्याफार प्रमाणात कोरोना बाबतीत काळजी घेत बाजूस ठेवून,आपल्याच घरी राहून साजरे करावेत, जेणेकरून आपले तसेच कुटुंबाचा बचाव या भयंकर महामारीत कसा होईल याबाबत समजून घेणे आहे.              कोरोनाबाबतीत लसीकरण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर सुरू करण्यात यावे,याबाबत तक्रार आल्यानंतर नेवासे तालुक्यातील सर्वच प्राथमिक उप केंद्रावरती लसीकरण मोहीम तातडीने सुरु करावीत, असे संबंधीत अधिकारी वर्गास सुचवले असल्याचेही लोंढें यांनी सांगितले.पक्षाचे नेवासे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे,शिवाजी सुपनर,सचिन देवकाते,विशाल माकोणे,राजेश बाचकर,शनैशवर आयनर,तसेच इतर सदस्य वर्गाच्या आग्रहाने संबधितांना सुचनाही केल्या असुन,सर्वांनी आपल्या घरीच रहावे,असेही संभाजी लोंढें यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment