जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीतांसाठी सतत लढणारे आ.सुरेश धस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीतांसाठी सतत लढणारे आ.सुरेश धस

 जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीतांसाठी सतत लढणारे आ.सुरेश धसनगरी दवंडी

आष्टी - आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची चाचणी केल्यानंतर चाचणी पाॅझिटिव्ह चाचणी आल्यानंतर प्रत्येकजण घाबरून जातो. त्यांना उपचारासाठी व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने त्याचा गंभीर परिणाम होऊन रुग्ण हातातून जातो. कोविड चाचणी केल्यानंतर अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास रुग्णांना कुठे भरती व्हावे, कशा पद्धतीने नोंदणी करावी, अशा अनेक माहितीपासून तो अलिप्त असतो. त्यामुळे संक्रमित निघालेला रुग्ण गोंधळून जातो. परिणामी अनेक अडचणी निर्माण होतात. या सर्व समस्यांचे निराकारण करण्याकरीता आमदार सुरेश धस यांनी "धस पॅटर्न" कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे. आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात याचे हेल्पलाइन नंबर घोषित करण्यात आले आहेत. कोविड रूग्णांच्या नातेवाईकांना येणाऱ्या प्रत्येक अडचणी स्वत; धस सोडवित असल्याने आष्टी मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


    

"धस पॅटर्न"द्वारे कोरोना अडचणी सोडविण्याचा प्रयत्न

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा कहर वाढत आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येकजण घाबरून जातो. त्यांना उपचारासाठी व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने त्याचा गंभीर परिणाम होऊन रुग्ण आपल्या हातातून जातो. त्यामुळे मतदार संघातील रूग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी बेड मिळून देण्यापासून त्यांना सर्व उपचार मिळेपर्यंत सर्व माहिती व सहकार्य आमदार धस यांच्या "धस पॅटर्न"द्वारे सोडविण्यात येत आहे. ही हेल्पलाइन गेल्या आठ दिवसापासून सुरू केली असून शेकडो रुग्णांना मदत करण्यात आली आहे.


आष्टी मतदार संघातील हेल्पलाइन क्रमांक

sureshdhashelpline@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतरिक्त 8446124024 क्रमांकावर २४ तास संपर्क साधण्याचे आवाहनही "धस पॅटर्न"च्यावतीने करण्यात आले आहे.

रुग्णांना तात्काळ माहिती

कोरोना संक्रमणानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ माहिती मिळावी त्यांच्या शंकाकुशंका सोडवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वत; आमदार सुरेश धस हे दखल घेत आहेत. कोविड संदर्भात वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केल्यास अडचणीत असलेल्या रुग्णांचा प्रश्न मार्गी लावण्यात येत असल्याचे उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर यांनी सांगितले

माझा भावाला कोरोना रोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालवत चालली होती. मला डाॅक्टरांना ऑक्सिजन असलेला बेड जेथे आहे तेथे उपचारासाठी पाठवा असे सांगितले. मी हेल्पलाईनवर फोन लावला. दोन तासात मला नगर येथे चांगल्या दवाखान्यात बेड मिळाला. पण तेथील डाॅक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लागतील असे सांगितले. मी त्याची नोंद केली स्वत; आमदार धसांनी मला फोन करून राञीच इंजेक्शन घेऊन माणूस पाठवून दिला. आज माझा भाऊ कोरोनामुक्त झाला असल्यााचे मत करोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाने व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here