अहमदनगर महाविद्यालयात ऑनलाईन आतंकवादविरोधी शपथ दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

अहमदनगर महाविद्यालयात ऑनलाईन आतंकवादविरोधी शपथ दिन साजरा

 अहमदनगर महाविद्यालयात ऑनलाईन आतंकवादविरोधी शपथ दिन साजरा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालयात दिनांक 21 मे या आतंकवाद विरोधी दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने ‘आतंकवाद विरोधी शपथ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ रजनीश बार्नबस यांच्या मार्गदर्शनातून राज्यशास्त्र विभाग आणि उन्नत भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    
आपण दरवर्षी भारतामध्ये दिनांक 21 मे हा दिवस आतंकवाद विरोधी दिवस पाळला जातो. या दिवशी 1991 साली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. आतंकवाद सारख्या अमानवी गोष्टींमुळे अनेक निष्पाप बळी जातात, लोकांच्या मनात मरणाची भीती निर्माण होते. मानवी अधिकाराच्या विरुद्ध असणार्‍या या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि परस्परांप्रती सद्भावना निर्माण व्हाव्यात याकरिता  आतंकवाद, आतंकवादी लोकांच्या अमानवीय गोष्टी यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यांच्यामध्ये मरणाची भीती निर्माण केली जाते. त्यामुळे या मानवी अधिकारांच्या विरूद्ध असणार्याध गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि पुन्हा प्रेम आणि सदभावनेने लोकांना जिंकण्यासाठी आतंकवाद विरोधी दिन पाळला जातो.  या दिवसाचं औचित्य लक्षात घेऊन तरुणांसह समाजातील सामान्यांना आतंकवाद विरूद्ध राहण्यासाठी शपथ दिली जाते. प्रामुख्याने तरूण वर्गाला आतंकवाद, हिंसा यापासून दूर ठेवत समाजात शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी जागरूक केले जाते, एकता वाढवली जाते. देशातील तरूणांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली जाते. ‘ऑनलाईन पद्धतीने आतंकवाद विरोधी शपथ’ या उपक्रमात 9 विद्यापीठांशी संलग्न 115महाविद्यालयातील 915 व्यक्तींनी सहभाग घेतला घेतला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ सुनील कवडे आणि उन्नत भारत अभियानचे समन्वयक श्री विलास नाबदे यांनी नियोजन केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बाळासाहेब गायकर, डॉ अरविंद नागवडे, डॉ सय्यद रझाक रजिस्ट्रार श्री दीपक अल्हाट तसेच आय.क़्यु.ए.सी. समन्वयक डॉ प्रितमकुमार बेदरकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment