ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ उभारणार- संजय भापकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ उभारणार- संजय भापकर

 ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ उभारणार- संजय भापकर



नगरी दवंडी

अहमदनगर ( गुंडेगाव): अलीकडच्या काळात निसर्ग बदलत चालला आहे. ऋतुचक्र बदलत चालल्याने वातावरण, हवामान, पर्यावरण बदलावर परिणाम होत आहे. आज कोरोनामुळे सर्वांचीच ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. या जागतिक कोरोना महामारीने माणूस पुरता घायाळ झाला आहे. हे कोणामुळे घडतंय आणि का घडतंय, याला जबाबदार कोण याचा प्रत्येकाने विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरसुद्धा आपल्या औषधांच्या चिठ्ठीवर झाडे लावा, झाडे जगवा, ऑक्सिजन वाढवा असा सल्ला देत आहेत.

       वृक्षाचे जतन व संगोपन करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री - पुरुष, आबालवृद्ध, लहान-मोठे शाळकरी मुले, मुली प्रत्येकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने आता बिगरसरकारी संस्था, वृक्षप्रेमी संघटना व गावागावातील सामान्य जनतेचा सहभाग घेऊन वृक्षलागवड योजना ही लोकचळवळ म्हणून उभी करायला पाहिजे, तरच भविष्यातील ऑक्सिजनचे संकट टाळता येणार आहे. सध्या कोरोना संकटात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. जो तो ऑक्सिजनवर बोलताना दिसून येत आहे. तसेच ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. ऑक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. पृथ्वीवर औषधांचा व ऑक्सिजनचे एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे असतात. मानवावर आलेल्या या कोरोना संकटामुळे आज सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळू लागले असून, भविष्यात चांगल्या ऑक्सिजसाठी वृक्षारोपण चळवळ उभारण्याची गरज आहे.

मानव प्राणी तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारे पिंपळाचे झाड दिवसातून २४ तास ऑक्सिजन देतो. तथागत गौतम बुद्धांनी याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली होती आणि म्हणूनच या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हणतात. या झाडांची पाने औषधी गुणांनी युक्त आहेत. जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोक वृक्षाचाही समावेश आहे. यासोबतच वडाच्या झाडाचेसुद्धा खूप महत्त्व आहे. या झाडाला अक्षयवृक्ष म्हटले जात असते. भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजनला कायम ठेवायचे असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच त्याचे संगोपन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही वृक्ष लागवड लोकचळवळ उभा करण्याचा मानस निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांनी व्यक्त केला असून पुढील काळात गुंडेगाव वनहद्दीमध्ये व पडीक रानमाळ, शेताच्या बांधांवर वृक्ष लागवड  जूनच्या पहिल्या आठवड्यात  करण्यात येणार आसून यासाठी सामाजिक संस्थानी पुढे येवून वृक्ष दत्तक स्विकारले पाहिजे असं मत भापकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment