आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून म्युकर मायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तपासणी शिबीर..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून म्युकर मायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तपासणी शिबीर.....

 आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून म्युकर मायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तपासणी शिबीर..... 

दि. २९ मे पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन



नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेड मधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 'काळी बुरशी 'म्युकरमायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अगोदर या रुग्णांची नावनोंदणी करून घेण्यात येणार आहे. रुग्णांचे लवकर निदान होऊन त्यांना वेळीच उपचार होण्यासही आ. रोहित पवारांच्या संकल्पनेतून पार पडणारे हे राज्यातील पहिले शिबीर असणार आहे.


       म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी दि.२८ व २९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ९६९६३३०३३० या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संबंधित नावनोंदणी झालेल्या रुग्णांना शिबिराची तारीख व वेळ मोबाईल क्रमांकावर कळवण्यात येणार आहे. डोके दुखणे,दाढ दुखणे,नाकावर व गालावर काळा डाग येणे व दुखणे,गालावर सूज येणे व मुंग्या येणे,नाक कोरडे पडणे,नाकातून रक्तस्राव होणे,डोळे हलवण्यास असमर्थता व दुहेरी दृष्टी,डोळ्याला सूज येणे व अस्पष्ट दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत.कोरोना रुग्णांना व कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येक रुग्णाला काळ्या बुरशीचा म्युकर मायकोसिसचा धोका नसतो. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये.


*शिबिरात कुणाला सहभागी होता येईल?*

●कोरोना आजारातून बरे होऊन १ते३० दिवसांचा कालावधी झाला असेल.

●रोग प्रतिकारशक्ती कमी करणारे कॅन्सर,किडनी इत्यादी आजार असल्यास

●मधुमेह पूर्वीपासून अनियंत्रित असल्यास किंवा या आजारादरम्यान आढळला असल्यास.

या रुग्णांनाही शिबिरात सहभागी होता येणार आहे.

No comments:

Post a Comment