सावेडी मध्ये साकारणार मनपाचा हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 25, 2021

सावेडी मध्ये साकारणार मनपाचा हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट

 सावेडी मध्ये साकारणार मनपाचा हवेतून  ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट

  तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन कमी पडून देणार नाही-आ. संग्राम जगताप
नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी -कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यामध्ये  मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता.मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता,यामध्ये नागरिकही भयभीत झाले होते कोरोना बाबत उपाय करीत असताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता,याच पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेने  सावेडी अमरधाम जवळ हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटे मध्ये उपाय योजना करण्यात मदत होईल, यापुढील काळामध्ये शहरांमध्ये ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, मनपाच्या माध्यमातून ना नफा- ना तोटा या तत्वावर ऑक्सीजन प्लांटचे काम करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

           सावेडी अमरधाम जवळील मोकळ्या जागेत मनपाच्या वतीने साकरण्यात येणाऱ्या हवेतील ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या जागेची पाहणी करताना आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे,ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर,नगरसेवक राजेश कातोरे,उपायुक्त यशवंत डांगे,नगर रचनाकार चाटणकर, शहर अभियंता सुरेश इथापे,युवराज चव्हाण आदी उपस्थित होते.

       यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले की,सावेडीतील अमरधाम जवळील जागेत हवेतील ऑक्सिजन निर्मिती प्लांट साठी १० गुंठे जागेची आवश्यकता असून ही जागा दिली जाणार आहे. या ठिकाणी ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट सुरु करण्यात येणार असून १२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिन निर्मिती करण्यात येणार आहे,सुमारे ६५० लि. ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ठिकाणी लाईटची सोय असून लवकरच शेडची उभारणी करण्यात येणार आहे. ऑक्सीजन प्लांटच्या ठेकेदाराकडे तीन वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम राहणार आहे. तसेच ना नफा- ना तोटा या धर्तीवर हा प्लांट सुरू करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सीजन भरण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे, दिनांक 27 मे रोजी ही निविदा उघडण्यात येणार असून,लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here