साईभक्तांसाठी मोफत पवित्र उदी व प्रसाद पोहच देण्याचा महत्त्वाचा निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

साईभक्तांसाठी मोफत पवित्र उदी व प्रसाद पोहच देण्याचा महत्त्वाचा निर्णय

 साईभक्तांसाठी मोफत पवित्र उदी व प्रसाद पोहच देण्याचा महत्त्वाचा निर्णय

आता घरात बसून मिळणार साईबाबांची फ्री मध्ये उदी..!



नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

जगभरातील करोडो भाविकांसाठी संजीवनी असलेली साईबाबांची पवित्र उदी कोरोनाच्या संकटकाळात भाविकांच्या मदतीला निघाली आहे. उदीच्या एका पाकिटासाठी भाविक आटापिटा करताना दिसतात. अनेकजण या उदीची पुडी अखंड सोबत बाळगतात. भाविकांसाठी मोठा आधार वाटणारी उदी कोरोनाच्या संकटकाळात त्यांना घरपोच उपलब्ध करून देण्याची मागणी भाविकांकडून होत होती. यावर भाविकांच्या भावनांचा सन्मान करत सीईओ बगाटे यांनी भाविकांना पोस्टाने घरपोच उदी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा खर्च साईसंस्थान करणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा कोरोना पार्श्वभुमिवर साईभक्तांसाठी मोफत उदी व प्रसाद पोहोच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी या संस्थानच्या वेबसाईट, व्हॉट्सऍप नंबर, मेल आयडीवर किंवा श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी या पेजवर भाविकांनी आपले संपुर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सह उदीची मागणी नोंदवली तर त्यांना उदी पाठवण्यात येईल. गेल्या चोवीस तासात देशभरातील दीड हजार भाविकांनी उदीची मागणी नोंदवली आहे, असे साईसंस्थानचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी सांगितले. द्वारकामाईतील धुनीत रोज ६० ते ६५ किलो उदी तयार होते. वर्षाला जवळपास ७०० ते ८०० गोण्या उदी तयार होते. यातून जवळपास दोन ग्रॅम वजन असलेले दोन कोटी उदी पाकिटे तयार करण्यात येतात. मंदिर सुरू असल्यावर प्रत्येक भाविकाला रांगेत एक पाकीट देण्यात येते. संस्थानच्या तिन्ही उत्सवात संस्थानचे सभासद असलेल्या जवळपास दोन लाख भाविकांना ही उदी घरपोच पाठवली जाते. यासाठी चारशे किलो उदी लागते. साईभक्तांना पोस्टाने घरपोच मोफत उदी आणि प्रसाद देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment