कोठी येथील क्लेरा ब्रुसगर्ल्स हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी - चंद्रकांत उजागरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

कोठी येथील क्लेरा ब्रुसगर्ल्स हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी - चंद्रकांत उजागरे.

 कोठी येथील क्लेरा ब्रुसगर्ल्स हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी - चंद्रकांत उजागरे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 11 कोठी येथिल स्लम एरिया व परिसरातील नागरिकांसाठी क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी विश्व मानव अधिकार परिषदेचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक 11 मधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून सध्या सुरू असलेल्या आरोग्य केंद्र पुरेसे नाही लोकांची गैरसोय होत आहे या गोष्टीचा विचार करून विश्व मानव अधिकार परिषदेच्यावतीने लसीकरण केंद्र म्हणून क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल येथे लसीकरण केंद्र अहमदनगर महानगरपालिके मार्फत सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.  या परिसरातील नागरिकांना सहजतेने लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होता यावे लसीकरणाचा उद्देश सफल व्हावा आणि प्रभागातील लोकांना सोयीचे ठिकाण व्हावे म्हणून मध्यवर्ती ठिकाणी असलेले व मोठ्या जागेची उपलब्धता असलेल्या क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment