प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व संगमनेर तालुका यांची राज्यमंत्री बच्चू कडू कोविडं आरोग्य मंदिर अहमदनगर तसेच पारनेर येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व संगमनेर तालुका यांची राज्यमंत्री बच्चू कडू कोविडं आरोग्य मंदिर अहमदनगर तसेच पारनेर येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट

 प्रहार जनशक्ती पक्ष राहाता व संगमनेर तालुका यांची राज्यमंत्री बच्चू कडू कोविडं आरोग्य मंदिर अहमदनगर तसेच पारनेर येथील   शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेटनगरी दवंडी

शिर्डी शहर प्रतिनिधी : 

राहाता तसेच संगमनेर तालुक्यातील  प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल अहमदनगर येथील राज्यमंत्री बच्चू कडू कोविडं आरोग्य मंदिर तसेच पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांच्या लोकनेते शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट दिली. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माननीय संतोष पवार तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष मेजर विनोदसिंग परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निलेश लंके साहेबांना तिरंगा देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री बच्चु कडू यांनी भ्रमणध्वनी द्वारा आमदार निलेश लंके यांच्या रुग्णसेवेचे कौतुक केले तसेच रुग्णांशी संवाद साधून लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मेजर विनोद परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले, जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदिप थोरात, राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, राहाता शहराध्यक्ष अविभाऊ सनासे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोमचंद कडू, गणेशराव कणसे, उपाध्यक्ष विजय काकडे, दिव्यांग उपाध्यक्ष नितीन भन्साळी, संघटक वसंत काळे, समनवयक जगणं सरोदे, अनिल थोरात, उद्धव वाळे, दर्शन वाकचौरे, सुनील कुडेकर आदी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here