ना कुठला गाजावाजा, ना कसला अभिमान,२४ तास जनतेची सेवा करून "स्वाभिमान" जपत असलेले डॉ. श्रीकांत पठारे व पत्नी डॉ. पद्मजा पठारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 13, 2021

ना कुठला गाजावाजा, ना कसला अभिमान,२४ तास जनतेची सेवा करून "स्वाभिमान" जपत असलेले डॉ. श्रीकांत पठारे व पत्नी डॉ. पद्मजा पठारे.

 ना कुठला गाजावाजा, ना कसला अभिमान,२४ तास जनतेची सेवा करून "स्वाभिमान" जपत असलेले डॉ. श्रीकांत पठारे व पत्नी डॉ. पद्मजा पठारे.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

कोरोनाचा कहर काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यात रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमिडिसीवीर इंजेक्शन भेटत नाहीत. अशी सर्वत्र परिस्थिती असताना पारनेर तालुक्यात स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील कोव्हीड सेंटर उभारून २४ तास कोव्हीड रुग्णांची मोफत सेवा करणारा "एक डॉक्टर" पारनेरकरांना लाभला आहे. अगदी शांतपणे रुग्णांमध्ये राहून ते २४ तास सेवा देत आहेत. आपण दिलेल्या सेवेचा ते कुठलाही गाजावाजा करताना दिसत नाहीत. ते रुग्णांची करत असलेल्या सेवेबद्दल कधीच ते अभिमान, गर्व दाखवत नाहीत. २४ तास जनतेची सेवा करून "स्वाभिमान" जपत असलेले डॉ. श्रीकांत पठारे व पत्नी डॉ. पद्मजा पठारे.

पारनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी पूर्णवाद भवन येथे १०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारून गेल्या महिन्याभरापासून डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे रुग्णांची सेवा करत आहे. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील एक रुपयांची देखील अपेक्षा न ठेवता कोव्हीड रुग्णांसाठी मोफत उपचार सुरू केले. स्वतःच्या दवाखान्यातील बेड, ऑक्सिजन सिलिंडर, स्टाफ सर्व काही कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेत मोफत दाखल केले. स्वतः पती-पत्नी २४ तास रुग्णांना सेवा देत आहेत. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील रुग्णांना कोव्हीड सेंटर उभारून मोफत उपचार करनारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर असून त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल दस्तुरखुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुजय विखे, आमदार नितेश लंके, तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे स्वतःची रुग्णवाहिका कोव्हीड रुग्णांसाठी मोफत देण्यात आली असून रुग्णांच्या सेवेसाठी आपल्या हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ त्यांनी कोव्हीड सेंटरमध्ये कामाला लावला आहे. त्यांनी सुरू केलेल्या या रुग्णसेवेच्या पुण्याच्या कामाला पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्हा व संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामध्ये अद्ययावत बेड, पुठ्यांचे बेड, रुग्णांना लागणारी औषधे, सलाईन, पाण्याच्या बाटल्या, फॅन, दैनंदिन रुग्णांसाठी लागणारे जेवण, पैष्टीक आहार, फळे, अंडे हे देखील मोठ्या प्रमाणात समाजातील दानशूरांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

      त्यांनी आतापर्यंत कोव्हीड सेंटरमधून सुमारे ३५० ते ४०० रुग्णांना बरे करून घरी सोडले आहे. तर आता सध्या जवळपास १५० रुग्ण उपचाराधीन आहेत. ते करत असलेल्या कामाचा ते कधीच गाजावाजा करत नाहीत. "आपण केलेल्या सेवेचा कधीच गाजावाजा करू नका, आपल्या यशाचा डंका जगभर पिटल्याशिवाय राहणार नाही" या उक्तीप्रमाणे डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला अमोल गजरे, पूनम खोडदे, दिपाली शेळके, नवनाथ निमोणकर, प्रशांत निंबाळकर, भाऊसाहेब निमोणकर, निकिता औटी, स्नेहल उमाप, महेश उमाप, अक्षय फाफाळे, संतोष फाफाळे, अभिजित झावरे, संध्या गुंड, शीतल चत्तर आदी दिवसरात्र रुग्णांसाठी सेवा देत आहेत.

No comments:

Post a Comment