हरिओम हेल्पलाइनच्या माध्यमातून चिचोंडी पंचक्रोशीत दिलासा..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

हरिओम हेल्पलाइनच्या माध्यमातून चिचोंडी पंचक्रोशीत दिलासा..!

 हरिओम हेल्पलाइनच्या माध्यमातून चिचोंडी पंचक्रोशीत दिलासा..!

पंधरा दिवसात लाखोंची मदत, हजारो नागरिकांची मोफत सेवा,



 नगरी दवंडी

अहमदनगर/प्रतिनिधि- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पेशंटसाठी तसेच चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील अत्यावश्यक सेवेसाठी चिचोंडी पाटील चे माजी उपसरपंच शरद पवार यांनी एक संकल्पना राबवत चिचोंडी पाटील शासकीय रुग्णालय मध्ये हरी ओम हेल्पलाइन हि संकल्पना सुरू केली आहे ,

   नगर तालुक्यात पहिल्यांदाच हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवला जात असल्याने हजारो रुग्णांना मोफत सेवा पुरवली जात आहे.  चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयात कोरोणा रुग्णाची परिस्थिती खालावल्यास त्याला अहमदनगर येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यासाठी हरिओम हेल्पलाईन तर्फे ॲम्बुलन्स सुविधा मोफत दिली जात आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या सर्व कोवीड रुग्णांना मोफत जेवण हरिओम हेल्पलाइन तर्फे दिले जात आहे. तसेच एखाद्या रुग्णाला  राहत्या घरी त्रास जाणवत असेल तर हरिओम हेल्पलाइनशी संपर्क केल्यास त्यास रुग्णालयात उपचार घेईपर्यंत सर्व जबाबदारी हरिओम हेल्पलाइन स्वीकारते.

    सध्या कोरोना काळात कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड त्यांना न मिळालेल्या तातडीच्या उपाययोजनांनमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे ,चिचोंडी पाटील परिसरात असा प्रकार घडू नये त्यासाठी हरिओम हेल्पलाईन तर्फे रुग्णांची मोफत सेवा केली जात असून या हेल्पलाईनने त्यांनी सुरु केलेल्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाने गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे हरी ओम हेल्पलाईन ही चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील तसेच नगर तालुक्यातील दात्यांना त्यांना संपर्क करून मदतीचे आवाहन करत आहे त्यातून मिळणारी मदतीमधून कोरोणा रूग्णांसाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत.

    नगर तालुक्यातील आठवड गावचे पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व अमीर उद्योगसमूहाचे चेअरमन विजय मोरे  यांना हरिओम हेल्पलाईनने संपर्क साधून कोवीड रुग्णांच्या मदतीसाठी आवाहन केले असता त्यांनी

 नागरिकांसाठी दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, व एक रुग्णवाहिका दिली,त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका कालींदाताई मुरलीधर पुंडे यांनी रुग्णांना हरिओम हेल्पलाईनच्या माध्यमातुन वाफेचे मशीन खोकल्याचे औषध,मेडिसिन,पी पी किट दिल्याने चिचोंडी पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना याचा मोठा फायदा झाला.

हरिओम हेल्पलाइन या टीममध्ये यामध्ये माजी उपसरपंच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, आठवड गावचे सरपंच राजेंद्रबापू मोरे, उपसरपंच बाबासाहेब मोरे, डॉक्टर राहुल पवार, डॉक्टर कांबळे, संतोष कोकाटे ,विजय कोकाटे, सुभाष दिलवाले, चंद्रकांत पवार, संतोष वाडेकर, बबनराव शेळके, दत्ता जाधव, अमोल ठोंबरे, सुरेश पवार, गजू शेंदुरकर, चक्रपाणि ठोंबरे ,युवराज हजारे, भाऊ करांडे, दादा पवार, निखिल पवार, जितु गाडे, बाळू खकाळ आदि काम करत असुन त्यांनी सुरु केलेल्या हेल्पलानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

【मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन-

हरिओम हेल्पलाईनने नागरिकांच्या सुविंधेंनसाठी 0241/2690212 हा क्रमांक सुरु केला असुन मदतीसाठी संपर्क.साधण्याचे आवाहन केले आहे,किंवा जर दात्यांना मदत करावयाची असल्यासही संपर्क साधावा अस सांगितले आहे.】


मोफत लस मिळाल्याने हेल्पलाइनचे आभार-

 दोन दिवसापूर्वी मला रेमडेसिविर लसची गरज होती त्यासाठी मी हरिओम हेल्पलाइनशी संपर्क साधला असता त्यांनी मला तातडीने व मोफत लस उपलब्द करुन दिल्याने मला मोठा आधार भेटला व मी आजारातुन बरी झाली ,हरिओम हेल्पलाईनने सुरु केलेली सेंवा आम्हा गरीबांनसाठी देवदुत बनली आहे

 -कुसुमबाई पटेकर,】

No comments:

Post a Comment