सभापती काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज रुग्णवाहिकेची लोकार्पण..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 25, 2021

सभापती काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज रुग्णवाहिकेची लोकार्पण..!

 सभापती काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज रुग्णवाहिकेची लोकार्पण..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेची प्रतीक्षा अखेर संपली टाकळी ढोकेश्र्वर गटातील कार्यक्षम जिल्हा परिषदेचे सभापती मा काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज रुग्णवाहिकेची लोकारपन झाले अनेक दिवसापासून खडकवाडी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने परिसरात असलेल्या रुग्णांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या परंतु दाते सरांच्या माध्यमातून सभापती झाल्यापासून अनेक महत्वाची कोटीवधीची कामे या गटात चालू आहेत सध्याच्या काळात रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची होती त्या निमित्ताने परिसरातील आदिवासी व सामान्य रुग्णांस त्याचा फायदा होईल त्या प्रसंगी ग्रामपंचायतग्रामीण रुग्णालय खडकवाडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, मा. श्री काशिनाथ दाते सर,सभापती कृषी व बांधकाम समिती जि. प. अहमदनगर यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी उपस्थित रामदास भोसले, उप जिल्हाप्रमुख शिवशेना, सरपंच सौ. शोभा शिंदे, उपसरपंच अक्षय ढोकळे, अमोल रोकडे, धनंजय ढोकळे, विकास रोकडे, विठ्ठल शिंदे, कैलास आग्रे, प्रसाद कर्नावट, प्रविनशेठ भन्साळी, संपत आहेर,पोपट गागरे, गोरक्ष चिकणे अर्जुन केदार, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी भांगे मॅडम व इतर सर्व वैद्यकीय स्टाप उपस्थित होते.

रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने शिवसेना उपविभाग प्रमुख अमोल रोकडे यांच्या वतीने सभापती काशिनाथ दाते सर यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here