नैतिक जबाबदारी स्वीकारून महसूलमंत्री थोरात यांनी पोलीस दलाची माफी मागावी - संतोष नवसुपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 7, 2021

नैतिक जबाबदारी स्वीकारून महसूलमंत्री थोरात यांनी पोलीस दलाची माफी मागावी - संतोष नवसुपे

 संगमनेर मध्ये पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवराष्ट्र सेनेच्या वतीने निषेध

नैतिक जबाबदारी स्वीकारून महसूलमंत्री थोरात यांनी पोलीस दलाची माफी मागावी - संतोष नवसुपेनगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यात पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवराष्ट्र सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची व संगमनेर तालुक्यातील नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र पोलिसांची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी 6 मे रोजी संगमनेर तालुक्यात काही जमावााकडुन  पोलिसांवर हा हल्ला झाला. पोलिस हे कोरोना काळात देवदूत आहेत. तसेच की ज्या संगमनेर तालुक्यात महसुल मंत्री मा. बाळासाहेब थोरात राहतात व ते स्वत: सत्ताधारी पक्षात मंत्री पदी आहेत .व त्यांचे मेव्हणे मा डॉ सुधीर तांबे हे स्वत: आमदार आहेत. त्यांच्या सौभाग्यवती आम्ही लहान असताना पासुन पाहतो त्याच संगमनेर तालुक्या च्या कित्येक टर्म व वर्षा नु वर्ष नगराध्यक्ष आहेत व त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष आहेत. 

             असे स्वत: थोरात व त्यांचे हे तीन तांबे या तालुक्याचे मंत्री व पदाधिकारी असताना अशा तालुक्यात पोलिसांवर हा मोठा हल्ला होतो व पोलिस तेथे गंभीर रित्या जखमी होतात ही शरमेची बाब आहे. की जे पोलिस आपले कुटुंबा पासुन लांब राहुन व कोरोना महामारी पासून जनतेच्या आरोग्याचे रक्षण करतात सध्या सर्वात जास्त बळी पोलिसच जात असताना, त्यांच्या वर हा हल्ला होतो या हल्ल्या विरोधात शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. व या हल्ल्यात  जे अपराधी आहेत त्यांच्या वर कायदेशीर रित्या कारवाई झाली पाहिजे. 

        व तसेच या तालुक्याचे महसुल मंत्री मा बाळासाहेब थोरात व या तीन तांबे यांनी आपली नैतिक जबाबदारी समजुन यांनी महाराष्ट्र पोलिसांची व जनतेची जाहीर माफी मागितली पाहीजे. 

      तसेच शिव राष्ट्र सेना पक्ष हा पोलिस प्रशासनाचा अहोरात्र पाठीशी राहील झालेल्या घटना ही पुन्हा घडु नये व घडल्यास शिव राष्ट्र सेना जाब विचारल्या शिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here