अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद ः श्रीनिवास अर्जुन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद ः श्रीनिवास अर्जुन

 अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद ः श्रीनिवास अर्जुन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अनाम प्रेम संस्थेने कोरोनाग्रस्त रुग्णाची चांगली सेवा व उपचार केल्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचले. रुग्णाला जेवणाची सोय तसेच मनोरंजनासाठी टेलीव्हीजनची व्यवस्था केली. रुग्णसेवेसाठी अनाम प्रेम ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रातंधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगीतले.
नगर तालुक्यात कोवीड सेंटर चालू करण्यासाठी कोन्ही जागा देत नव्हते. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने नगर पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या पुढाकारातून तसेच पंचायत समिती सभापती सुरेखा संदीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात चार कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. प्रथम या कोविड सेंटरला कोणी जागा देण्यास तयार नव्हते.  इसळक येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम व अरणगाव येथील मेहरबाबा संस्थेने बिल्डींग उपलब्ध करून दिल्या. यामुळे हजारो नागरिकांना या कोविड सेंटरचा फायदा होऊन  प्राण वाचले. या सेंटर मध्ये तालुक्यातील सर्व सामन्य कुंटुबातील नागरिकांनी जाऊन उपचार घेतले. या सेंटरमार्फत देण्यात येणार्‍या सुविधाची उपसभापती डॉ. दिलीप पवार व प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गट विकास अधिकारी सचिन धाडगे यांन पाहणी केली. यावेळी त्यांनी अनाम प्रेमच्या पदाधिकारी व सेवेकरी यांचे कौतुक केले. याप्रसंगी बी. डी. कोतकर, दत्तात्रय दिवटे, दत्ता कोतकर , दत्ता मुरलीधर कोतकर, सदाशिव कोतकर, विशाल घोलप, अमोल पगारे, ज्ञानेश्वर डहाळे उपस्थित होते.

अनाम प्रेम संस्थेच्या अंटिजन व्हॅनच्या माध्यमातून जवळपास असणार्‍या गावामध्ये अँटीजन तपासणी शिबीर आयोजीत केले जाते. या शिबीरामध्ये कोरोनाचे लक्षणे असणार्‍या नागरिंकानी तपासणी करावी. - डॉ. दिलीप पवार, - उपसभापती पंचायत समिती

No comments:

Post a Comment