अश्लील फोटो सोशल मिडियावर प्रसारित करुन फिर्यादीसह कुटुंबास जीवे माअश्लील फोटो सोशल मिडियावर प्रसारित करुन फिर्यादीसह कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईरण्याची धमकी देणारा आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

अश्लील फोटो सोशल मिडियावर प्रसारित करुन फिर्यादीसह कुटुंबास जीवे माअश्लील फोटो सोशल मिडियावर प्रसारित करुन फिर्यादीसह कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईरण्याची धमकी देणारा आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 अश्लील फोटो सोशल मिडियावर प्रसारित करुन फिर्यादीसह कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अश्लील फोटो इंस्टाग्राम (सोशल मिडिया) वर प्रसारीत करुन तसेच फिर्यादीस व कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. रोहित पाटोळे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.17 मे2021 रोजी फिर्यादी मुलीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. यात रोहित जालिंदर पाटोळे (रा.फर्याबाग , अहमदनगर) याचे व माझे एकमेंकावर प्रेम होते. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहित पाटोळे याने त्याचे मोबाईलमध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते.त्यानंतर आरोपी रोहित पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची मागणी घालु लागला.त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवू लागला. तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्हीडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला गुरजि. नं.1 178/2021 भादविक 354 (ड), 506 (2).507 सह माहीती तंत्रज्ञान कायदा 2020 चे कलम 66 (अ), 66 (ई) व 67 प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल केलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फरार झालेला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून खात्रीशीर बातमी मिळाली, सदर गुन्हयातील आरोपी रोहीत पाटोळे हा येरवडा, पुणे येथे राहत आहे . सदर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकाँ फकीर शेख, पोहेकाँ संदीप घोडके, पोना रविकिरण सोनट्टके, पोकॉ सागर सुलाने, पोना शंकर चौधरी, पोकॉ रोहीत येमुल, पोका मयुर गायकवाड, पोना लक्ष्मण खोकले, पोकॉ मच्छिद्र बर्डे व चालक पोहेको संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने मिळून येरवडा (पुणे) परिसरात आरोपीचा शोध घेऊन आरोपी रोहित जालींदर पाटोळे (वय 24 रा.फर्याबाग, सोलापुर रोड, अहमदनगर) यास गुन्हयात वापरलेल्या मोबाईलसह ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाईकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस करीत आहे. आरोपीवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात 268/2019 भादविक 143, 324, 324, 504, 506 गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here