शहराचा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त विकासावर भर : आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

शहराचा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त विकासावर भर : आ.संग्राम जगताप

 शहराचा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त विकासावर भर  : आ.संग्राम जगताप

शहरात प्रथमच उभारलेल्या सौर हायमास्ट व पथदिव्यांचे लोकार्पण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराचा विकास करताना शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच काळा बरोबर चालून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त विकासावर भर देत आहे. सध्याच्या काळात सौर उर्जेला महत्व आले आहे. विजेची बचत होण्यासाठी शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सौर उर्जे वर चालणारे पथदिवे लावण्यास भर देत आहे. पक्षिय राजकाराचे जोडे बाहेर कडून सर्वांना बरोबर घेत काम करत आहे. नगर शहरात प्रथमच अत्याधुनिक सौर पथदिव्यांची उभारणी केली आहे. यासाठी नगरसेवक स्वनिल शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
माजी सभागृहनेता स्वप्निल शिंदे यांच्या प्रयत्नातून आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन निधीतून मंजूर केलेल्या निधीतून प्रभाग चार मध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सौर हायमास्ट व पथदिव्यांचे लोकार्पण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते नवले नगर मधील श्री गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात झाले. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा आरोग्य समितीचे प्रमुख डॉ.सागर बोरुडे, कुमार नवले, सचिन जगताप, आदिनाथ मस्के, योगेश खरमाळे, मयूर कूलथे, निलेश बांगरे, गजानन भांडवलकर, सुमित कुलकर्णी, अमित गटणे आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे म्हणाले, प्रभाग चार मध्ये विकास कामे करत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. प्रभागाच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांनी वेळोवेळी बहुमोल सहकार्य केले असल्याने त्यांचे मी आभार मानत आहे. त्यांच्याच सहकार्याने मंजूर झालेल्या निधीतून प्रभागातील विविध भागात अत्याधुनिक 12 सौर हायमास्ट व 50 सौर पथदिवे लावण्यात आली आहेत. या पथदिव्यांमुळे प्रभागाच्या वैभवात भर पडण्या बरोबरच मनपाची मोठ्याप्रमाणात विजेची बचतही होणार आहे.

No comments:

Post a Comment