महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 9, 2021

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न

 महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न
नगरी दवंडी

जामखेड - आज रोजी सकाळी ११.०० वाजता हिंदवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील जुने शिऊर रोड येथील घिसाडी समाज बांधवांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली 

हिंदवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे दुधाने अभिषेक करण्यात आला व पूजन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच कोरोना चे नियमाचे पालन करून समाज बांधवांनी अभिवादन केले.यवेळी बोलताना गायकवाड म्हणाले महाराणा प्रताप हे महापराक्रमी योद्धा तसेच आपल्या मातृभूमी व रयतेवर प्रेम करणारे धुरंदर योद्धे व राजे होते.

राजस्थान येथील जगप्रसिद्ध झालेली हल्दीघाटी तील लढाईमध्ये 3000 राजपुतांनी इतिहास कालीन लढाई ही गुलामगीरी स्विकारण्याच्या विरोधातील स्वाभिमानी राजाची जगप्रसिद्ध लढाई होती. तसेच समाजातील तरुणांनी महाराणा प्रताप की जय ,ज्या वेळेस ही घोषणा कानी पडते.  ज्या राजाचा आपण जयजयकार करतोय त्याचा इतिहास वाचला पाहीजे व समृद्ध झालं पाहीजे.

समाज घडवायचा असेल तर तरुणांनी वाचन केले पाहिजे.एका पराभवाने खचून न जाता पुन्हा, उभारून यश खेचून आणले पाहिजे हीच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच  सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कचरू साळुंखे,दिलिप पवार, धनराज पवार, प्रकाश साळुंके, दिलीप साळुंखे, नागेश पवार, मायकल साळुंखे, विकी साळुंके, आशु साळुंके, शुभम पवार, संस्कार पवार आदी समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment