पत्रकार दातीर खून प्रकरणाच्या तपासात दिशाभूल करणाऱ्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर कारवाई करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 6, 2021

पत्रकार दातीर खून प्रकरणाच्या तपासात दिशाभूल करणाऱ्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर कारवाई करा

 पत्रकार दातीर खून प्रकरणाच्या तपासात दिशाभूल करणाऱ्या  पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर कारवाई  करा

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या पत्नी सविता दातीर यांची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात बेमुदत उपोषण करणारनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- राहुरी येथील दक्ष पत्रकार संघटनेचे संस्थापक रोहिदास दातीर यांची दि.६एप्रिल रोजी अपहार करून निर्घृण पणे हत्या करण्यात आली हा गुन्हा राहुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ त्यांच्याकडे असलेला तपास काढून घेऊन श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या कडे दिला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी आजपर्यंत चार आरोपी अटक असून एक आरोपी फरार आहे.या चार आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असताना व एक आरोपी फरार असतांना या गुन्ह्याचा तपास चालू असताना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी ५ मे रोजी वृत्तपत्राला माहिती देऊन बातमी प्रसिद्ध केली.बातम्यांमध्ये असे म्हटले की,कान्हू मोरे यांच्या कबुलीजबाबा वरून पत्रकार रोहिदास दातीर यांचा गणेगाव येथील जमिनीच्या वादातून हत्या झाली प्रत्यक्षात ज्या कारणावरून व ज्या जमिनीवरून हत्या झाली आहे ती जमीन राहुरी बुद्रुक येथील सर्व्ह नं.427 या जमिनी बाबत चौकशी व तपास अद्याप पर्यंत झालेला नाही माननीय श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास असताना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी राजकीय दबावापोटी व स्वतःच्या स्वार्थासाठी हा गुन्हा दिशाभूल करून कलाटणी देऊन 

तपास चालू असताना अशा बातम्या प्रसिद्ध करणे हे बेकायदेशीर आहे. दि.५ मे रोजी वृत्तपत्रांमध्ये खोटी बातमी देऊन खऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचे काम पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करत असून त्याची त्या बातम्याच्या आधारे सखोल चौकशी करून रीतसर कारवाई करावी व त्यांना राहुरी पोलीस स्टेशन मधून कार्यमुक्त करण्यात यावे अन्यथा पुढील आठवड्यात माझ्या कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here