शरद पवार विचार मंचच्या वतीने बुथ हॉस्पिटलला अंडे व पाणी बॉटलांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

शरद पवार विचार मंचच्या वतीने बुथ हॉस्पिटलला अंडे व पाणी बॉटलांची मदत

 शरद पवार विचार मंचच्या वतीने बुथ हॉस्पिटलला अंडे व पाणी बॉटलांची मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत निस्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणार्या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला अंड्याचे ट्रे व पाणी बॉटलच्या बॉक्सची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी भैय्या बॉक्सर, नदीम सय्यद, अर्जुन बडेकर, आयान सय्यद, मुजीर सय्यद, शकिल सय्यद, मोहन कड, नाजीम कुरेशी, कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद म्हणाले की, देशासह राज्यात कोरोना महामारीचे संकट आले असता रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वप्रथम सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटल पुढे आले. या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसर्या लाटेत देखील बुथ हॉस्पिटल कोरोनाच्या लढ्यात पाय घट्ट रोवून अनेकांचे जीव वाचवत आहे. रुग्णांना दररोज विविध खाद्य वस्तूं व पाणीची गरज भासत असताना त्यांना ही मदत पुरविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भैय्या बॉक्सर म्हणाले की, कोरोनाच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च येत असताना बुथ हॉस्पिटलने सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. तर अशा सेवाभावी हॉस्पिटलला अल्ताफ सय्यद यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते सर्वसामान्यांना जीवनावश्यक किराणा वस्तूचे वाटप करणे, आर्थिक दुर्बल घटकांना विविध मदत देण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर देवदान कळकुंबे यांनी सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुध्द लढा सुरु आहे. बुथ हॉस्पिटलने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू माणून आरोग्यसेवेचे कार्य केले. सर्व सामान्यांना बुथ हॉस्पिटलवर मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment