लायन्स क्लब ऑफ अमदनगर प्राईड तर्फे वर्चुअल चित्रकला स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

लायन्स क्लब ऑफ अमदनगर प्राईड तर्फे वर्चुअल चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 लायन्स क्लब ऑफ अमदनगर प्राईड तर्फे वर्चुअल चित्रकला स्पर्धेचे आयोजन

विद्यार्थ्यांसह युवकांना सहभागी होण्याचे आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील लायन्स क्लब अहमदनगर प्राइड तर्फे शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींसाठी वर्चुअल (ऑनलाईन) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या चित्रकला स्पर्धेचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येते, परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा वर्चुअल घेण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. पायल धूत, सचिव मनयोगसिंग माखिजा, खजिनदार रविकुमार तुम्मनपेल्ली, प्रकल्प प्रमुख सनी वधवा, अभिजीत भळगट, गुरुजोत नारंग, सरबजितसिंग आरोरा, नरेंद्र बोठे यांनी केले आहे.
 ही चित्रकला स्पर्धा चार गटात होणार असून, गट क्रमांक एक मध्ये वय वर्षे 4 ते 6, गट क्रमांक दोनमध्ये वय वर्षे 7 ते 10, गट क्रमांक तीन मध्ये वय वर्षे 11 ते 15, गट क्रमांक चार मध्ये वय वर्षे 16 व त्यापुढील स्पर्धक असणार आहेत. सर्व स्पर्धकांना या स्पर्धेत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गगन वधवा मो.नं. 9970423334 व रिद्धी धुप्पड मो.नं. 8551835733 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत दि.4 जून असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here