जामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 12, 2021

जामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद, व्यवसायिकांची उपासमाराची वेळ.....

 जामखेड येथील कटिंग सलून चे दुकाने एक महिन्यापासून बंद,  व्यवसायिकांची उपासमाराची वेळ..... नगरी दवंडी

अहमदनगर - कोरोनाच्या महामारी ने सर्वसामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे सार्वजनिक उपक्रम नात्यागोत्याचा भेटीगाठी आणि जवळच्या माणसांच्या प्रत्येक जण दूर झालेला आहे त्याचबरोबर रोजच्या गरजा देखील सध्या उपलब्ध नाहीत  जामखेड परिसरातील कटिंग सलून ची दुकाने गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत त्यामुळे डोक्यावरचे केस बोकडा सारखे वाढले आहेत ही एक अवस्था म्हणून जरी असली तरी नाभिक समाजाच्या भावना ही तितक्याच महत्वाच्या आहेत हातावर पोट असणारा हा समाज गेल्या महिनाभरापासून घरातच कोंडून बसला आहे,मागील वर्षीच्या कोरूनाच्या पहिल्या लाटेपेक्षा या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत कोरूणाच्या महामारीत मृत्यूची संख्या वाढली आहे त्यामुळे स्वतः गिराईक पण भीतीने ग्रस्त झाला आहे अशा कठीण परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत असताना अनंत अडचणी येत असतात, इतरांप्रमाणे सलूनच्या दुकान ना ठराविक वेळी कोरोणाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी  नाहीतर आम्हाला रोख स्वरूपात शासनाने अनुदान दयावे अशी मागणी होत आहे याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा या लॉकडाउनच्या काळात समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केल्याचे ऐकवीत आहे त्याचे कारणही हेच आहे हातावर पोट असणाऱ्या घरच्या लेकरा बाळांना कसे जगवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here