प्रभाग सातची वाटचाल नागरिकांना दिलेल्या वचन पुरतीकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

प्रभाग सातची वाटचाल नागरिकांना दिलेल्या वचन पुरतीकडे

 प्रभाग सातची वाटचाल नागरिकांना दिलेल्या वचन पुरतीकडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः या प्रभाग सात मधील नागरिकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या मागील कामांमुळे आमच्यावर विश्वास ठेवून तीन नगरसेवक निवडून दिले. या प्रभागात अनेक भागांमध्ये आमच्या प्रयत्नांतून अनेक विकास कामांसोबत मुलभूत सुविधा देण्याचे काम सुरु आहे. प्रभागातील सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लाऊन प्रभाग सातची वाटचाल नागरिकांना दिलेल्या वचन पुरतीकडे नेण्याचे काम पूर्ण होत आहे. असे प्रतिपादन नगरसेवक अशोक बडे यांनी केले आहे.
प्रभाग सात मधील नागापूर गावठाण येथील सोनुले घर ते बल्लाळ घर ते थोरात घर या रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक अशोक बडे यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी दत्ता सप्रे, मदन आढाव, भालचंद्र भाकरे, मनपा इंजिनिअर पारखे, भाऊसाहेब थोरात, कचरू भोर, रवी थोरात, रामदास पाढळे, नितीन सप्रे, लाह्णु सप्रे, राजू बल्लाळ, महादेव भोर उपस्थित होते.
याप्रसंगी दत्ता सप्रे म्हणाले या भागातील नागरिकांच्या कायम संपर्कात राहून त्यांचा आडी- अडचण समजून त्या दूर करण्याचे काम आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक करत असतो.नागरिकांच्या सुख-दुखात आम्ही कायम त्याचा सोबत असतो. जनतेचे प्रश्न सोडवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे सांगितले. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा जसा महाराष्ट्रात शिवसेना हा एकच पक्ष आहे. तसेच नगरमध्ये सामान्यलोकांच्या अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देणारा शिवसेना हा एकच पक्ष आहे. आणि तो कायम राहील, असे नगरसेवक मदन आढाव म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here