अशांतता निर्माण होईल असे पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. - श्रीनिवास बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 12, 2021

अशांतता निर्माण होईल असे पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. - श्रीनिवास बोज्जा

 अशांतता निर्माण होईल असे पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई  करावी.  - श्रीनिवास बोज्जानगरी दवंडी

अहमदनगर - सध्या कोरोनाच्या लाटेमुळे नागरिक भयभीत झाले असून अनेक समाज कंटक कोरोना बाबत चुकीची माहिती पोस्ट केल्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्तिथी निर्माण झाली असून अशा पोस्ट करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.

     साध्याच्या परिस्तिथी मध्ये नागरिकांमधील भिती कसे दूर होईल याचा प्रयत्न प्रशासन एकीकडे करीत असतांना दुसरी कडे काही उपद्रवी व्हाट्सअप, फेसबुक व इतर सोशल मीडिया द्वारे कोरोना बाबत चुकीचे व भयभीत होणारे पोस्ट करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  सोशल मीडिया वर पोस्ट करतांना या पोस्ट मुळे नागरिकांना फायदा होत असेल नागरिकांमधील भिती दूर होत असेल तरच पोस्ट करावे अन्यथा करू नये या साठी प्रशासनाने चुकीचे व सामाजिक शांतता भयभीत होत असलेल्या पोस्ट करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावे वे तसे सर्व संबंधित पोलीस स्टेशन ला आदेश करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here