आरोळे कोव्हीड सेंटर मध्ये रंगले लेझीम चे डाव..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

आरोळे कोव्हीड सेंटर मध्ये रंगले लेझीम चे डाव.....

 आरोळे कोव्हीड सेंटर मध्ये रंगले लेझीम चे डाव..... 



नगरी दवंडी

जामखेड- तणाव मुक्त करण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे संकल्पनेतून विविध उपक्रम. कोरोना संसर्ग मध्ये तणावमुक्त राहण्यासाठी जामखेडमध्ये महाराष्ट्राचे लोक कला लेझीम डावात रुग्णाने नृत्य करून घेतला आनंद जामखेड मध्ये आमदार रोहित दादा पवार याचे  संकल्पनेतून जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. व डॉ रविदादा आरोळे, डॉ शोभाताई आरोळे  यांच्या माध्यमातून आरोळे हॉस्पिटल येथे  कोव्हीड रुग्णांची मोफत सेवा केली जाते . तसेच तणावमुक्त राहण्यासाठी ऑर्केस्ट्रा, भजन, कीर्तन, गायन, वादन ,नृत्य, संगीताच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात असे मत समनव्यक  सुलताना शेख यांनी व्यक्त केले.

   अशा कार्यक्रमामुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळवून तनाव मुक्त राहतात व नवचैतन्य निर्माण होते असे मत  रुग्णांनी व्यक्त केले.लेझीम साठी मयुर भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.आमदार रोहित पवार व डॉक्टर रावीदादा आरोळे  यांचे कोव्हीड रुग्णांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment