"अखंड मैत्री प्रतिष्ठान" कडून चेडे यांस वैद्यकीय उपचारासाठी दहा हजाराची मदत.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

"अखंड मैत्री प्रतिष्ठान" कडून चेडे यांस वैद्यकीय उपचारासाठी दहा हजाराची मदत..

 "अखंड मैत्री प्रतिष्ठान" कडून   चेडे यांस वैद्यकीय उपचारासाठी दहा हजाराची मदत..



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथील विद्यालयात १९९२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विदयार्थी आणि विद्यार्थिनींनी २०१५ साली एकत्र येऊन १९९२ अखंड मैत्री ग्रुप स्थापन केली.

१९९२ चे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून १९९२अखंड मैत्री ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतो...

प्रतिष्ठान अक्षय तृतीयेला कान्हूर पठार येथील कै. कॉ.बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटरला दहा हजारांची मदत दिली होती.

पारनेर येथील चेडे कुटुंबातील 

नबाजी चेडे यांना अ.नगर येथील पंडित हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते त्यांना उपचारासाठी जास्त खर्च  येणार होता, त्यांची परिस्थिती हालाकीची असल्याने ते उपचार घेऊ शकणार नव्हते पण पारनेर येथील समाजसेवी संस्थांना आवाहन केल्यावर मदतीचा ओघ चालू झाला..

त्यातच १९९२ अखंड मित्र आणि मैत्रिणींना सदर बातमी कळल्यावर १९९२ अखंड मैत्री प्रतिष्ठान चे श्री.रमेशभाऊ भोसले,  सौ.जयश्री घावटे  ( ठुबे ), श्री.सचिन अंबुले, रामदास औटी, डॉ.संदीप औटी,  संदीप कदम,  ह.भ.प.भाऊसाहेब क्षीरसागर महाराज,  न्यू इंग्लिश स्कूल च्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.पोटे मॅडम,संतोष लोहकरे,पोपट औटी,भाऊसाहेब गदादे आणि विजय पुजारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत

एकूण - १०१००/- रुपये नबाजी चेडे यांच्या उपचारासाठी जमा केले.नबाजी चेडे यांचा मुलगा मंगेश आणि मुलगी वैजयंती यांच्याकडे उपचारासाठी मदत दि.३० मे रोजी सुपूर्त केली.यावेळी १९९२ अखंड मैत्री ग्रुप सदस्य व पारनेर तालुका डॉ.असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.संदीप औटी, १९९२ अखंड मैत्री ग्रुप च्या अध्यक्षा सौ.जयश्री घावटे ठुबे, संजय झंझाड, न्यू इंग्लिश स्कूल च्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.लताताई पोटे मॅडम आणि संतोष लोहकरे आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment