संगीताच्या तालावर बाधित वृध्दाने धरला ताल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

संगीताच्या तालावर बाधित वृध्दाने धरला ताल

 संगीताच्या तालावर बाधित वृध्दाने धरला ताल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः आरोळे हॉस्पिटल मधील कोवीड सेंटर मधील विलीनीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना  झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले. आणि काय आश्चर्य ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांनी डान्स केला त्यामुळे येथील अनेक रुग्णांनाना देखील मोह आवरला नाही. त्यानी देखील संगीतावर ताल धरल्याने त्यांच्या मनातील भितीच निघून गेली.
कोरोना महामारीमुळे श्रीमंतापासुन ते सर्व गरीबांना पर्यंत प्रत्येक जण भितीच्या सावटाखाली आहेत. अनेक हॉस्पीटलने तर माणुसकीला काळिमा फासला आहे. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनी तर हॉस्पीटल प्रशासनावर गुन्हे दाखल केले आहेत. पण आरोळे हॉस्पिटल याला अपवाद आहे. रूग्णाची मानसिकता काय हे देखील ओळखता आले पाहिजे रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा भिती गेली पाहिजे. याकडे हॉस्पीटल मधील कर्मचारी देखील काळजी घेत आहे एक प्रकारे रूग्णांचे मनोरंजन झाले तर निश्चितच रुग्णांचा याच भावनेतून आरोळे हॉस्पिटल मधील समन्वयक सुलताना शेख यांनी सवँ रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले आणि काय आश्चर्य ऐशी वर्षाचे आजी आजोबांनी देखील डान्स केला आणि सर्वच वातावरण बदलून गेले. रुग्णांच्या मनातील भीती देखील पळुन गेली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here