राहुल शिंदे पाटील आपल्या रांजणगाव मशीद गावचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
शासन स्तरावर राहुल शिंदे पाटील लसीकरणासाठी करत आहे पाठपुरावा
नगरी दवंडी
पारनेर प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील शिंदे हे नेहमीच त्यांच्या गावातील लोकांसाठी काही न काही सतत देण्याचा निर्धार करत असतात. सध्याच्या कोरोना च्या महामारीत आता त्यांनी असे ठरवल्याचे जाणवत आहे की, जोपर्यंत संपूर्ण रांजणगाव मशिद या गावचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत ते स्वतः शांत बसणार नाहीत असे दिसत आहे. त्यांनी स्वतः चे लसीकरणही त्यासाठी केलेले नाही. संपूर्ण गावचे लसीकरण झाल्यानंतरच ते स्वतः लस घेणार आहेत, अशी पक्की खुणगाठ त्यांनी त्यांच्या मनाशी बांधून घेतली आहे. सध्या सर्व गावांमध्ये लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे.
सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळेच गावातील सर्व जनतेला लस उपलब्ध व्हावी व सर्वांचे आरोग्य सुधारावे, यासाठीच राहुल पाटील शिंदे हे प्रयत्न करत आहेत. म रांजणगाव मशीद हे गाव खूप मोठे असल्यामुळे सर्वांचे लसीकरण होण्यासाठी शिंदे हे सरकारी पातळीवर खूप प्रयत्न करत आहे. कोरोना होऊ नये व गावातील माणसे या महामारीत जास्त आजारी पडू नये. यासाठी लसीकरण गरजेचे आहे. सर्वांना लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी राहुल पाटील शिंदे हे प्रयत्न करताना दिसत आहेत
सध्या त्यांनी गावामध्ये सुरू केलेल्या कै. आण्णासाहेब शिंदे पाटील कोविड सेंटर मध्ये सुपा परिसरातील भरपूर अनेक कोरोनाग्रस्थ रुग्ण उपचार घेत आहेत.
आज गावामध्ये खूप दिवसांनी रांजणगाव मशिद येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये लसीकरण झाले. यावेळी रुई छत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी गुंजाळ, डॉ.अजय येणारे, सरपंच प्रीती साबळे, उपसरपंच बाबासाहेब जवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment