संजोग हॉटेल येथे संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्र सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

संजोग हॉटेल येथे संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्र सुरु

 संजोग हॉटेल येथे संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्र सुरु

लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही- बारस्कर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु लसीकरणाचा येणारा साठा व आरोग्य केंद्रावर होणारी नागरिकांची मोठी गर्दी त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.यासाठी आम्ही आ.संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून मंगल कार्यालय मध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी अशी मागणी केल्यानंतर आ.संग्राम जगताप यांनी ताबडतोब प्रशासनाची संवाद साधून व प्रशासनाला सूचना देऊन मंगल कार्यालयांमध्ये पावसाळ्यापूर्वी लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केल्यानंतर आज संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार आहे, मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना खुच्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे गर्दीही नियंत्रणामध्ये आली आहे. संजोग हॉटेलच्या माध्यमातून लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांना चहा-बिस्कीट व नाष्ट्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये असे आव्हान विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले.
विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या विशेष प्रयत्नातून संजोग हॉटेल  येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, प्रदीप पंजाबी,अजय पंजाबी,डॉ.गाढे,मोहित पंजाबी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक डॉ.सागर बोरुडे म्हणाले की, लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी प्राप्त झालेले डोस नुसारच नागरिकांना लसीकरणासाठी बोलवण्यात येणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment