शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात सोमवारी मनपात बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात सोमवारी मनपात बैठक

 शहर विकासाबरोबर आरोग्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध- आ.संग्राम जगताप

शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात सोमवारी मनपात बैठक




नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- शहर विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकट काळात नागरिक भयभीत झाले आहे त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे रुग्णांना वेळेवर बेड,औषधे,ऑक्सिजन आदींसह विविध समस्या भासत आहे ते मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे याचं बरोबर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या आहे सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले असल्यामुळे रस्त्याची कामे करायला रहदारीची अडचण निर्माण होत नाही यासाठी शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्याची कामे सुरू आहे सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे असे प्रतिपादन,आ. संग्राम जगताप यांनी केले.

     प्रभाग क्र. 11 मधील जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणाऱ्या स्टेट बँक रस्ता,चांदणी चौक रस्ता,नगर कॉलेज रस्ता, वस्तुसंग्रहालय रस्ताचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,शहर अभियंता सुरेश इथापे,इंजि. श्रीकांत निंबाळकर,भुपेंद्र परदेशी, सोनू चौधरी, ठेकेदार भैय्या वाबळे आदि उपस्थित होते.

      सभापती अविनाश घुले म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर हा प्रभाग क्रमांक 11 मध्ये येत असून या प्रभागांमध्ये विविध विकास कामे मंजूर असून आधी जमिनीअंतर्गत विकास कामे मार्गी लावले असून यामध्ये भुयारी गटार योजना, फेज 2 पाणी योजनाचे काम मार्गी लागले असल्यामुळे रस्त्याची कामे हाती घेतली आहे आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यांसाठी मोठा निधी प्राप्त झाला होता त्या रस्त्याची कामे सुरू असुन आज या कामाची पाहणी करण्यात आली आहे. ही कामे दर्जेदार व्हावे याकडे विशेष लक्ष आहे याच बरोबर शहरातील इतर रस्त्यांची कामे ही लवकर सुरू होतील असे ते म्हणाले

No comments:

Post a Comment