कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी डॉ श्रीकांत पठारे पारनेरमध्ये उभारणार लहान मुलांसाठी ५० बेडचे कोव्हीड सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी डॉ श्रीकांत पठारे पारनेरमध्ये उभारणार लहान मुलांसाठी ५० बेडचे कोव्हीड सेंटर

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी डॉ श्रीकांत पठारे पारनेरमध्ये उभारणार लहान मुलांसाठी ५० बेडचे  कोव्हीड सेंटर

कोरोनावर मात करून तो योद्धा पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांच्या बचावासाठी  पारनेरमध्ये लहान मुलांसाठी  ५० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर उभारणार असल्याची माहिती डॉ श्रीकांत पठारे यांनी दिली आहे.बालरोगतज्ज्ञ यांच्याशी याबाबत चर्चा सुरू असून पारनेर शहरात लवकरच हे ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर उभारणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ४०० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रौढ नागरिकांना अनेक ठिकाणी कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून कोरोनावर उपचार मिळत आहे. परंतु लहान बालकांसाठी अद्याप कुठेही उपचार केंद्र सुरू झालेले नाही. खासगी दवाखान्यात उपचार घेणे गोरगरिबांना परवडणारे नाही. त्यामुळे पारनेर तालुक्यातील लहान मुलांच्या उपचाराची गैरसोय होऊ नये म्हणून पारनेर शहरात ५० बेडचे  ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर उभारणार आहे. याबाबत बालरोगतज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने या कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाबधित लहान मुलांवर उपचार केले जाणार आहे. अशी माहिती डॉ श्रीकांत पठारे यांनी दिली.

पारनेर शहरात पूर्णवाद भवन येथे ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटर सुरू असून त्यामध्ये आतापर्यंत ११५० रुग्णांवर उपचार केले आहेत. स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर आहेत. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल राज्यभरातून सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करत असताना त्यांना गेल्या १० दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून या कोरोनायोध्याने पुन्हा रुग्णसेवेला सुरुवात केली असून आज सकाळी पूर्णवाद भवन येथे भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस करून त्यांच्यावर उपचार केले आहे. डॉ श्रीकांत पठारे स्वतः कोरोनाबधित असताना कोरोना  रुग्णांप्रती असणारा आदर व रुग्णसेवेची ओढ त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल पारनेर तालुक्यातील जनता व रुग्णांना त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी व आदर आहे.

No comments:

Post a Comment