नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातुन नागापूर बोल्‍हेगांव परिसरात लसीकरणाचे दुसरे केंद्र सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातुन नागापूर बोल्‍हेगांव परिसरात लसीकरणाचे दुसरे केंद्र सुरू

 नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातुन नागापूर बोल्‍हेगांव परिसरात लसीकरणाचे दुसरे केंद्र सुरू

नागरिकाचे आरोग्‍य  सदृढ व निरोगी राखण्‍यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची खरी गरज आहे- मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप



नगरी दवंडी

नगर – कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूची साखळी तोडण्‍यासाठी प्रशासन प्रयत्‍न करित आहेत. तरी प्रत्‍येकाने शासकीय नियमाचे पालन करावे या विषाणूच्‍या संसर्गामुळे नागरिकांच्‍या जिवीताला धोका निर्माण होत आहे. तरी नागरिकांचे आरोग्‍य अबाधीत राखण्‍यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे खरी गरज आहे. यासाठी मोठया प्रमाणात सरकारने लस खरेदी करून प्रत्‍येक नागरिकाचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्‍यावे. यासाठी मा.शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. याच बरोबर लसीकरणासाठी ऑल लाईन पध्‍दत चुकीची आहे. प्रत्‍येक नागरिकाला ऑन लाईन पध्‍दीने रजिस्‍ट्रेशन करता येत नसल्‍यामुळे अनेक नागरिक या लसीकरणापासून वंचित राहू शकतात. तरी लसीकरण केंद्रावरच नांव नोदंणी करून प्रत्‍येकाला लस दयावी नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातून बोल्‍हेगांव नागापूर परिसरामध्‍ये लसीकरणाचे दुसरे केंद्र सुरू करण्‍यात आले असल्‍याचे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने नागापूर बोल्‍हेगांव परिसरामध्‍ये नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दुस-या केंद्राचा शुभारंभ मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्‍या शुभहस्‍ते सुरू झाले. यावेळी महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे, आयुक्‍त मा.श्री.शंकर गोरे, उपायुक्‍त श्री.यशवंत डांगे, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे, मा.श्री.बाळासाहेब जगताप, नगरसेवक मा.श्री.राजेश कातोरे, मा.श्री.किरण कातोरे, मा.श्री.मुन्‍ना शेख, मा.श्री.हनुमंत कातोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, नगर शहरामध्‍ये मनपाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य केंद्रात लसीकरण सुरू आहे. मोठया प्रमाणात गर्दी होत असल्‍यामुळे आरोग्‍य यंत्रणेवर ताण होत आहे. लसीकरणाचा तुटवडा मोठया प्रमाणात असल्‍यामुळे प्रत्‍येक नागरिकांना लस देणे शक्‍य होत नाही. मोठया प्रमाणात लस उत्‍पन्‍न झाल्‍यास शहरातील विविध भागामध्‍ये मनपा मोठया प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करून नगर शहरातील जनतेला लवकरात लवकर लस देण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे यांच्‍या सुचने नुसार बोल्‍हेगांव परिसरामध्‍ये लसीकरणाचे केंद्र सुरू झाले आहे असे ते म्‍हणाले.

नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे म्‍हणाले की, बोल्‍हेगांव नागापूर परिसरामध्‍ये मोठया प्रमाणात लोकवस्‍ती आहे. मनपाच्‍या माध्‍यमातून या भागामध्‍ये  लसीकरणाचे एकच केंद्र सुरू असल्‍यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्‍याची भिती निर्माण झाली होती. यासाठी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्‍या कडे पाठपुरावा करून लसीकरणाचे दुसरे केंद्र सुरू व्‍हावी अशी मागणी केल्‍यानंतर लगेच लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. तरी नागरिकांनी गदी व गोंधळ  न करता शांततेत लस घ्‍यावी. प्रत्‍येकाला लवकरात लवकर लस मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment