महिलांनी वृक्षारोपण चळवळीमध्ये सहभागी व्हावे - मलनताई ढोणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

महिलांनी वृक्षारोपण चळवळीमध्ये सहभागी व्हावे - मलनताई ढोणे

 महिलांनी वृक्षारोपण चळवळीमध्ये सहभागी व्हावे - मलनताई ढोणे

नगर स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष लावणार 531 झाडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महिला समाजामध्ये काम करत असताना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. वृक्षारोपण ही लोकचळवळ व्हावी यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर जागा मिळेल तेथे दोन वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, तसेच महिलांनी वृक्षारोपण चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन उपमहापौर मालनताई ढोणे यांनी केले.
सिद्धीबाग येथे अहमदनगर स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष परिवाराच्यावतीने 531 वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ उपमहापौर मालन ताई ढोणे व अ‍ॅड.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, अभिजित ढोणे, ज्येष्ठ नागरिक कैलास ढोरे, नारायण चिलका, पुरुषोत्तम बोगा, उल्हास ढोरे, राकेश बोगा, उद्यानप्रमुख उद्धव म्हसे, संतोष साळवे, राहुल मुथा, सोनू बोरुडे आदी उपस्थित होते. अ‍ॅड.धनंजय जाधव म्हणाले की, नगर जल्लोष नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. नगर स्थापना दिनानिमित्त शहरांमध्ये नगर जल्लोष परिवाराने 531 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आपल्या शहरावर असणारे प्रेम प्रत्येकाने आपल्या कृतीतून दाखवून द्यावेत असे ते म्हणाले..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here