मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील विविध कोविड सेंटरची अचानकपणे पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 8, 2021

मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील विविध कोविड सेंटरची अचानकपणे पाहणी

 मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील विविध कोविड सेंटरची अचानकपणे पाहणी

कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुरू करण्यास प्रयत्नशील- समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडेनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे.यासाठी हॉस्पिटल शहरातील कोवीड सेंटर व खासगी हॉस्पिटल मधील सुविधांची माहिती घेऊन कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत काही कोरोना बाधित रुग्ण ऑक्सिजन अभावी जीव गमावत आहे. प्रत्येक कोविड सेंटर मध्ये 20 बेडचे ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू लवकरच आरोग्य विभाग व प्रशासनाशी बैठक घेऊन आरोग्यसेवेच्या उपाययोजना केल्या जातील आ.संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आरोग्य समितीच्या मार्फत कोरोना रुग्णांना चांगले आरोग्य चांगले आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केले.

नगर शहरातील विविध कोविड सेंटरला मनपा आरोग्य समितीच्या वतीने भेटी देऊन आरोग्य सुविधाची माहिती घेताना समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, नगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आरोग्य समिती प्रयत्नशील आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यकाळातील कोरोनाचे नियोजन होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here