खरवंडी कासार मध्ये लोकसहभागातून ,कोंवीड सेंटर सुरू नगरी दवंडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 7, 2021

खरवंडी कासार मध्ये लोकसहभागातून ,कोंवीड सेंटर सुरू नगरी दवंडी

 खरवंडी कासार मध्ये लोकसहभागातून ,कोंवीड सेंटर सुरूनगरी दवंडी

खरवंडी कासार प्रतिनिधी

खरवंडी कासार मध्ये कोरोनायने ग्रामीण भागातही हात पाय पसरले आहेत अशातच ऊसतोड कामगार कारखान्यावरून आपल्या गावी परतत आहेत त्यामुळे खरवंडी कासार मध्ये सेंटर सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे होते गावातील काही नागरिक व जलक्रांती व प्रनेते दत्ता बडे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून संत भगवान बाबा  कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे सेंटरचे उद्घाटन येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते वसंत खेडकर  येळी गावचे सरपंच संजय बडे सुरेश केळगंद्रे , निलकंठ आव्हाड ढाकणवाडी गावच्या  सरपंच सुरेखा ताई ढाकणे,माणिक  बटुळे मृत्युंजय गर्जे आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवान दराडे यांनी या कोवीड सेंटरला ११००० हजारांची मदत केली खरवंडीतील  तील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश कटारिया यांनीही  या सेंटरसाठी  ११००० हजारांची मदत केली.

 कोरोनाचे लक्षण वाटल्यास  त्यांनी तात्काळ संत भगवान बाबा या सेंटरमध्ये तात्काळ भरती व्हावे याठिकाणी रुग्णांसाठी चांगल्या सुविधा व उपचार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व त्यासाठी आम्ही मेहनत  घेऊ , कोरोना झाल्यावर घाबरून जाऊ नये असे जलक्रातीचे प्रणेते दत्ता बडे  म्हणाले यावेळी तालुकाध्यक्ष माणिक मामा खेडकर म्हणाले की, हे सर्वसामान्य कोविड सेंटर आहे हे कोणत्याही पक्षाचे नाही या सेंटरला सर्वांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here