पोलीसांनकडुन गरीब मुस्लिम कुटुंबास शिरखुर्मा किटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 13, 2021

पोलीसांनकडुन गरीब मुस्लिम कुटुंबास शिरखुर्मा किटचे वाटप

 पोलीसांनकडुन गरीब मुस्लिम कुटुंबास शिरखुर्मा किटचे वाटपनगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी 

 कोरोना महामारीमुळे इफ्तार पार्टीला फाटा देत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवनवीन कल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी मुळे रक्ताची गरज ओळखून जामखेड व खर्डा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आता त्यांचाच कल्पनेतून शहरातील मुस्लिम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले यामुळे या कुटुंबाचा रमजान चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे.

पोलिस स्टेशनमध्ये विधवा व गरीब कुटुंबास शिरखुर्मा किटचे वाटप करताना जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक किरण कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, अजहर सय्यद, मुक्तार कुरेशी, संग्राम जाधव, अरुण पवार, व मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here