ग्रामीण भागातील प्रा.आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करा:दत्तात्रय शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 10, 2021

ग्रामीण भागातील प्रा.आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करा:दत्तात्रय शिंदे

 ग्रामीण भागातील प्रा.आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करा:दत्तात्रय शिंदेनगरी दवंडी

माका प्रतिनिधी_कोरोनाच्या पहिली,दुसरी अन् तिसरयां अशा नुसत्या लाटीवर लाटी येणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे.इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे लसीकरण झपाट्याने होत नाही.कोरोना कहराच्या बचावासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे सांगितले जाते.तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच बाकी केंद्र या ठिकाणी नागरिकांना रोजच हेलपाटे मारावे लागत आहे यामुळे काही खेडयातील नागरिकांना लसीकरण सुरू असल्याची कल्पनाही नसल्याने नेवासे तालुक्यातील सर्व उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण सुरू करावे असे मत रासपचे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.                याबाबत तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच लसीकरण केंद्रावरती रोजच नागरिकांची भरपूर गर्दी होत आहे.गर्दी कमी करण्यासाठी काही ठिकाणी पोलिस यंत्रणेचाही वापर करण्यात येत आहे.काही केंद्रा वरती तर,डाॅकटर तसेच स्थानिक राजकीय पुढारी यांचा हस्तक्षेप होत असल्याचे बोलले जात आहे.याबाबत अशा ठिकाणी दैनंदिनी भांडणे होत असल्याचे समजते.आरोग्य अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही भागातील बस सेवा बंद असल्याने,तसेच साधने उपलब्ध नसल्याने,आडबाजुच्या खेडयातील नागरिकांची लससेवा घेण्यास गैरसोय होत असुन,काही भागात तर लसीकरणाबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत.                                    यासंदर्भात तालुक्यातील बहुतेक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विचारणा करुन सुद्धा समाधानकारक उत्तर मिळत नसुन,दैनंदिनी अशा या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी होत असलेल्या गर्दीने कोरोना वाढीचा धोका होण्याचा संभव दिसून येत असल्याने याबाबी लक्षात घेता तालुक्यातील प्रत्येक  प्राथमीक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी तातडीने संबंधित आरोग्य अधिकारयांनी आपल्या स्तरावर लसीकरण सुरू करण्याची गरज असुन,जेणेकरून याबाबत सर्वच घटकास लाभ मिळेल,याबाबत काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास तसेच सरपंचास दुरध्वनी ने संपर्क करून पुढील उपाययोजनेबाबतीत चर्चाही झाली आहे.असे मत तालुकाअध्यक्ष शिंदे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here