दुधाला ३२ रू.दर किंवा दुध उत्पादक शेतक-यांना थेट १० रू.अनुदान द्यावे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

दुधाला ३२ रू.दर किंवा दुध उत्पादक शेतक-यांना थेट १० रू.अनुदान द्यावे !

 दुधाला ३२ रू.दर किंवा दुध उत्पादक शेतक-यांना थेट १० रू.अनुदान द्यावे !

शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पञ पाठवून केली मागणी !


नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारने राज्यात तात्काळ टाळेबंदी लागु केली.टाळेबंदी लागु झाल्याने दुधाची मागणी घटली व परिणामी दुधाचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्वजी ठाकरे यांना ई-मेल पाठवून दुधाला प्रति लीटर ३२ रू.दर मिळावा किंवा दुध उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर थेट प्रती लिटर १० रू.अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे.

                देठे पाटील यांनी पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे की , महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या टप्प्यात लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. तेव्हा पासुन गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रती लिटर ३२ रूपयांवरून थेट १९ ते २० रूपयांपर्यंत खासगी व सहकारी दुधसंस्थांनी कमी केलेले आहेत. तथापि शहरांत माञ गायीच्या दुधाचा विक्री दर प्रती लिटर ५० ते ६० रू. आजही कायम आहे.तरी दुध खरेदी व विक्री दरांमधील हि तफावत दुधउत्पादक शेतकऱ्यांवर व शहरातील ग्राहकांवर मोठी अन्याय करणारी असुन , यातुन फक्त खासगी व सरकारी दुधसंस्थांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असुन त्याला गायी , म्हशींचा सांभाळ करणे देखील आता जिकिरीचे झाले आहे. १ आँगस्ट २०१८ पासुन गायीच्या दुधाला किमान २५ रू.प्रति ली.दर देण्याचे तत्कालीन सरकारने घोषित केले होते व राज्यातील खासगी तसेच सहकारी दुधसंस्थांनी देखील ते मान्य केले होते.परंतु आता लाँकडाऊनचे कारण पुढे करून सर्वच दुध संस्थांनी दुध खरेदी दर पाडले असल्याने ग्रामीण भागातील दुध व्यवसाय मोडकळीस आला आहे.तरी मुख्यमंत्री महोदय राज्यातील दुध उत्पादक शेतकरी मागीलवर्षी पासुन कोरोना काळात कोवीड योध्दा म्हणुन अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करत आपल्या बांधवांसाठी दुध पुरवठा करत आहे.तरी आपण या बाबतीत तातडीने हस्तक्षेप करून दुध खरेदी दर किमान ३२रू. प्रती ली.करावा किंवा शेतकऱ्यांना थेट प्रतिलीटर १० रू.अनुदान द्यावे व कोरोना काळात अडचणीत आलेल्या दुध उत्पादक शेतक-यांना आधार द्यावा.अन्यथा दुध उत्पादक शेतकरी व त्यांचे कुटुंब सतत दुध व्यवसाय तोट्यात जात असल्याने अक्षरशः उध्दवस्त होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here