मनपाच्‍या आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षपदी नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

मनपाच्‍या आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षपदी नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांची निवड

 मनपाच्‍या आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षपदी नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांची निवड



नगरी दवंडी

अहमदनगर-  कोवीड 19 चा प्रादुर्भाव दिवसें दिवस वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने नागरिकांना लसीकरण केंद्रातून लस देण्‍यात येत आहे. नागरिकांना मनपाच्‍या वतीने योग्‍य ते उपचार देण्‍यात येते आहे. तसेच उपाय योजना देखील करण्‍यात येत आहे. यापुढे कोवीड 19 ची तिसरी लाट येण्‍याची पूर्व सुचना तज्ञांच्‍या वतीने वर्तविण्‍यात येत आहे.  यासाठी मनपाच्‍या वतीने पुढील धोका लक्षात घेवू  आतापासूनच उपाय योजना सुरू करणे आवश्‍यक आहे. यासाठी समन्‍वय समितीच्‍या माध्‍यमातून नागरिकांच्‍या अडचणी सोडविणे सोयीचे होईल. यादृष्टीने मा.महापौर यांचे कार्यालयामध्‍ये सर्व पक्षिय आजी व माजी नगरसेवक यांची बैठक घेण्‍यात आली. त्‍यामध्‍ये नागरिकांना कोरोना संदर्भात उपचारासाठी येणा-या अडचणी बाबत नियोजन करण्‍याच्‍या दृष्टिने चर्चा झाली. कोरोना संदर्भात नागरिकांना योग्‍य ते उपचार मिळणे आवश्‍यक आहे. तसेच या संदर्भाती अडचणी लवकरात लवकर सोडविण्‍याच्‍या दृष्टिने सर्व पक्षिय समितीची नेमणुक करण्‍यात येत आहे. यामध्‍ये मनपाचे महापौर ,उपमहापौर, सभापती स्‍थायी समिती, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, महिला व बाल कल्‍याण समितीचे सभापती, उपसभापती हे पदसिध्‍द सदस्‍य असतील.

मा.डॉ.श्री.सागर बोरूडे, नगरसेवक समितीचे अध्‍यक्ष पदी निवड करण्‍यात आली. समितीचे सदस्‍य खालील प्रमाणे

मा.श्री.निखील वारे, माजी नगरसेवक (कॉग्रेस)मा.श्री.संजय ढोणे, सामाजिक कार्यकर्ते (भाजपा)मा.श्री.सतिष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते (भाजपा)मा.श्री.सचिन शिंदे, नगरसेवक (शिवसेना )मा.श्री.विपुल शेटीया , नगरसेवक (राष्‍ट्रवादी कॉग्रेस)मा.श्री.सचिन जाधव, माजी नगरसेवक (बसपा)

समितीच्‍या माध्‍यमातून शहरातील खाजगी दवाखाना, कोवीड सेंटर व नागरिक यांना ऑक्‍सीजन, बेड ,औषधोपचार, बिले या संदर्भात येणा-या अडचणी सोडविण्‍याच्‍या दृष्टिने सदरील समिती काम करतील. यामुळे गोर गरिब व गरजू रूग्‍णांना दिलासा मिळण्‍यास मदत होईल व रूग्‍णांना वेळेवर उप‍चार मिळण्‍यास मदत होईल या करिता सदर समितीस प्रशासनाने योग्‍य ते सहकार्य करावे.तरी याबाबत योग्‍य ती कार्यवाही व सहकार्य करणे बाबत संबधीतांना योग्‍य ते आदेश देण्‍यात यावेत.

 मनपा आरोग्‍यसमितीच्‍या अध्‍यक्षपदी नगरसेवक डॉ.सागर बोरूडे यांना निवडीचे पत्र देताना मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे, स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते मा.श्री.संपत बारस्‍कर, नगरसेवक मा.श्री.विनीत पाऊलबुधे, मा.श्री.सुनिल त्रिंबके, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.अजय चितळे, मा.श्री.सतिष शिंदे, मा.श्री.अजिंक्‍य बोरकर, मा.श्री.संजय शेंडगे, माजी नगरसेवक मा.श्री.निखील वारे आदी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment