एलईडी पथदिवे बसवा अन्यथा आंदोलन- कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

एलईडी पथदिवे बसवा अन्यथा आंदोलन- कोतकर

 एलईडी पथदिवे बसवा अन्यथा आंदोलन- कोतकर

केडगाव परीसरात अंधाराचे साम्राज्य...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या अनेक महिन्यापासून केडगांव परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे. अंधाराचा फायदा घेवून चोर्‍याचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केडगांव सोनेवाडी रोड वरील लोंढे मळा परिसरामध्ये शेतकरी वर्ग राहत आहे. या परिसरातील दिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेवून चोरडयांनी धुमाकुळ घातला आहे. केडगांव मधून जाणारा पुणे महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. केडगांव परिसरातील पथदिव्यांची दुरूस्ती करण्यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाय योजना करण्यात याव्या. बंद पथदिवे सुरू करावेत. तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसविण्यांत यावे अन्यथा कोणतीही पूर्व सुचना न देता कोरोना नियमाचे पालन करित लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मा.आयुक्त श्री.शंकर गोरे यांना माजी सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी दिले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे की, मी स्थायी समितीचा सभापती असताना संपूर्ण शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळी एलईडी पथदिवे बसविण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण केल्यानंतर मनपाच्या वतीने लेखी आश्वासन दिले होते की, लवकरात लवकर शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्यात येतील परंतु आजपर्यत कोणतीही कार्यवाही झालेली नाही एलईडी पथदिवे बसविण्याची निविदा प्रक्रिया न्यायालयात गेल्यामुळे किती दिवस लागतील याचा भरोसा नसल्यामुळे मनपाच्या वतीने संपूर्ण केडगांव परिसरामध्ये एलईडी पथदिवे बसवावेत असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment