दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वस्त्यांसाठी ५ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर - सभापती गणेश शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 9, 2021

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वस्त्यांसाठी ५ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर - सभापती गणेश शेळके

 दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वस्त्यांसाठी ५ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर  - सभापती गणेश शेळके नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

तालुक्यामध्ये पारनेर पंचायत समितीच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०२१  मधील कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवले होते त्यामध्ये ११२ वस्त्यांसाठी १२७ कामे मंजूर झालेली असून त्यासाठी पाच कोटी ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अशी माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली मागील वर्षांमध्ये बऱ्याच गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे झाली नाहीत त्यामुळे तो निधी परत शासनाला रिटर्न करावा लागला परंतु सन दोन हजार वीस एकवीस मध्ये वैयक्तिक लक्ष घालून प्रत्येक गावांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला आहे त्याचे संपूर्ण काम त्या त्या गावांमध्ये झाले पाहिजे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून तो निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये खर्च झाला पाहिजे यावरती भर देऊन जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक गावाने ही हा निधी लवकरात लवकर खर्च करून आपली कामे पूर्ण करावी असे आव्हान सभापती गणेश शेळके यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here